संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील पंकज मंगल कार्यालयाच्या बाजुला बजरंग नगर रणाळा येथील एका घरातून अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या एकूण 23 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना काल सायंकाळी 5 वाजेदरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी रूपाली वासनिक ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.