एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाकरे गटाचा तगडा उमेदवार, आनंद दिघेंच्या कुटुंबातील या व्यक्तीला तिकीट मिळणार, ठाण्यात मोठा डाव

ठाणे :- राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे यंदाच्या या निवडणुकीत अटीतटीची लढत होणार असल्याचं चित्र आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई आणि ठाण्यात कुणाला उमेदवारी दिली जाणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने कंबर कसली आहे. शिंदेच्या कोपरी पाचपाखाडी विधान सभा क्षेत्रात ठाकरे गट एका मोठ्या नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. आनंद दिघे यांचे पुतणे, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघेना यांना ठाकरे गट उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे.

शिंदे विरूद्ध दिघे

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. या राजकीय घडामोडींनंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या या लढतीकडे राज्याचं लक्ष आहे. अशातच ठाकरेंनी मोठी राजकीय खेळी केली आहे. एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु असणाऱ्या आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना शिंदेंच्या विरोधात रिंगणात उतरवण्याचं ठरवलं आहे.

ठाण्यात यंदा अटीतटीची लढाई

कोपरी पाचपाखाडी विधानसभेत मशाल विरुद्ध धनुष्यबाण लढत होणार आहे. ठाणे शहरातून ठाकरे गटाकडून माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची संधी दिली जाणार आहे. ठाणे शहर विधान सभा क्षेत्रातून त्यांना संधी मिळणार आहे.लोकसभेत पराभव झाल्याने ठाकरेंकडून राजन विचारे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आहे.

ठाणे शहर विधानसभेत मशाल विरुद्ध कमळ अशी लढत पाहायला मिळणार आहे. ओवळा माजिवाडा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे प्रताप सरनाईक विरुद्ध ठाकरे गटाचे माजी उपमहापौर नरेश मनेरा यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या मतदारसंघात लढत पाहायला मिळणार आहे. ठाण्यात 2 जागांवर मशाल विरुद्ध धनुष्यबाण लढत होणार आहे. तर ठाणे शहरात मशाल , कमळ आणि इंजिन अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

Credit by tv9 marthi

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अजितदादांच्या विरोधात तरूण नेत्याला उमेदवारी, शरद पवारांचा मोठा गेम

Wed Oct 23 , 2024
बारामती :- बारामतीत यंदा अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांविरोधात कोण उमेदवार असणार? याची राजकीय वर्तुळात कायमच चर्चा होत राहिली. यंदा होणारी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राचं जनमत सांगणारी ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर आता पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे जनतेचा कौल कुणाला? हे सांगणारी ही निवडणूक आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!