वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक, १६,०५,०००/- रू. मुद्देमाल जप्त

वाडी :- दिनांक २५.०७.२०२३ चे २१.०० वा.च्या दरम्यान पोलीस ठाणे वाडी हद्दीत फिर्यादी वसंत किसनराव निखारे वय ५४ वर्ष रा. स्मृती ले आउट, नामदेव लॉन जवळ, वाडी यांनी त्यांचे राहते घरी बुलेट क. एम. एच. ४० सि.एल ५७५४ किमती १५०,०००/- रु ची घरासमोर लॉक करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने फिर्यादीची मोटरसायकल चोरून नेल्याने फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस ठाणे वाडी येथे कलम ३७९ भा. दं. वी प्रमाणे गुन्हा दाखल होता.

गुन्हयाचे तपासात वाडी पोलीस ठाणेचे अधिकारी व अमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून तसेच तांत्रीक बाबींचा तपास करून आरोपी यांना निष्पन्न केले. आरोपी हे अमरावती येथे गाडगे नगर पोलीस ठाणे परीसरात आपले अस्तित्त लपवुन राहत असल्याने अमरावती येथे सापळा रचुन एका बिअर बार मध्ये आरोपी १) रितीक लेखीराम लांजेवार  वय २० वर्ष रा. कंट्रोल वाडी, आंबेडकर नगर, नागपूर २) संकेत दिपक कडु वय २९ वर्ष रा. श्रीनगर, नारायणपूर रोड, देवमा, अचलपूर जि. अमरावती यांना ताब्यात घेतले. आरोपींची विचारपूस केली असता आरोपींनी त्याचे साथिदार ३) कुणाल किसन बने वय २८ वर्ष रा. रामबाग कॉलोनी, ईमामवाडा ४) प्रितम उर्फ सिंधू उमाशंकर शर्मा वय २८ वर्ग रा. कंट्रोल वाडी, आंबेडकर नगर, नागपूर याचे सोबत चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींना नमुद गुन्हयात अटक करून त्यांची सखोल विचारपूस केली असता आरोपांनी पोलीस ठाणे हद्दीत तसेच ईतर पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरी तसेच घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींनी पोलीस ठाणे वाडी हद्दीत वाहन चोरीचे एकूण ६ गुन्हे, पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत वाहन चोरीचे २ गुन्हे पोलीस ठाणे एम. आय. डी. सी हद्दीत वाहन चोरीचा गुन्हा पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत गुन्हा पोलीस ठाणे राजापेठ, अमरावती हद्दीत १ वाहन चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांचे ताब्यातून गुन्हयातील चोरी केलेले १३ वाहने व ईतर तिन मोटरसायकल असे एकुण १६ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. आरोपींनी पोलीस ठाणे वाडी हद्दीत घरफोडीचे एकुण ३ गुन्हे तसेच पोलीस ठाणे गिट्टीखदान धंतोली, प्रतापनगर हद्दीत प्रत्येकी १ घरफोडीचा केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातून एकुण १६,०५,२००/-रूचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांचे क. १) रॉयल इनफिल्ड बुलेट क. एम.एच ४० सि.एल ५७५४, २) बुलेट क. एम.एच ४९ ४०१०, ३) टिकीएस रायडर क एम.एच ३१ एफ.डब्लू. १८२२. ४) अॅक्ट गाड़ी क एम. एच. ४०. सि.के ५११६. ५) अॅक्टीव्हा गाडी क. एम.एच ३१ ई. ३५२६, ६) पल्सर गाडी के. एम. एच ३१ एफ. एम ४२३६, ७) होन्डा ड्रिम नियो गाडी के. एम. एच ३१ एफ. ब्रेड २७५ ८) रॉयल इनफिल्ड बुलेट क. एम. एच. ४० वि.क्यू ५८६३९)की जिक्सर क. एम. एच ४० मि.पी. ४५५७, १०) बुलेट क. एम. एच ३१ एफ. एन ९५८७, ११) अॅक्टव्ह क. एम. एच ३१ ई.व्ही ०२९७, १२) ज्यूपीटर के. एम. एच २७ डि.बी ९५१४, १३) रॉयल इनफिल्ड बुलेट १४ ) हिरो होन्डा स्प्लेंडर १५) पल्सर फ. एम. एवं ३२ डि.पी २२७७, १६) पल्सर क. एम.एच ४० ए.एल. ७५१० अटक आरोपींची अधिक विचारपूस सुरू असून अजुनही गुन्हे उपडकीस येण्याची शक्यता आहे. वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रभाग, पोलीस उप-आयुक्त (परि क. १) सहा. पोलीस आयुक्त एम.आय.डी.सी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि प्रदिप रायण्णावार, पोनि गुन्हे विनोद गोडबोले, सपोनि राहुल सावंत, गणेश मुंडे, पोहवा. तुलसीदास शुक्ला, नापोअ. अजय पाटील, दुर्गादास माकडे, सोमेश्वर वर्षे, राहुल बोटरे यांनी केलेली आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खूनाचा गुन्हा उघडकीस आरोपीस अटक

Fri Aug 4 , 2023
नागपूर :-दिनांक ०२.०८.२०२३ चे १९.०० वा. पूर्वी पो. ठाणे एम.आय.डी.सी. हददीत निलडोह ग्रामपंचायत हददीत एम.आय.डी.सी. से १८ इंडस्ट्रीयल एरीया, या प्लॉट चया मोकळ्या जागेत कुणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून एक अनोळखी महीला वय अ. ३५ वर्षे हिचे चेहरयावर डोक्यावर, उजवे हातावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून, तिला जिवानिशी ठार केले. याप्रकरणी पो. ठाणे एम.आय.डी.सी. येथे आरोपीविरुध्द कलम ३०२ भा.द.वी. अन्वये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com