सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत कमला नेहरु व एल.ए.डी महाविद्यालयात कार्यशाळा

नागपूर :-  2 ऑक्टोबर पर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या बार्टी अंतर्गत सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता प्रस्ताव पाठविणे व ऑनलाईन पध्दतीने जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रितीने कसे प्राप्त करावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

20 सप्टेंबर रोजी कमला नेहरु महाविद्यालय, सक्करदरा या ठिकाणी जाऊन जिल्हा जात प्रमाणपत्र पउताळणी समितीच्यावतीने विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्रे यांनी जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप केले. समितीचे उपायुक्त सुरेंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज जात पडताळणी करिता कशा प्रकारे भरता येईल त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे याबाबत मार्गदर्शन केले.

21 सप्टेंबर रोजी एल.ए.डी. महाविद्यालयात जाऊन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने समितीच्या सदस्य सचिव आशा कवाडे यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज जात पडताळणी करिता कशा प्रकारे भरता येईल, यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

समितीच्यावतीने विधी अधिकारी  दाभाडे यांनी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र यांच्या आवश्यकतेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच ज्यांना सी.ई.टी. व एनईईटी आदी करिता जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज महाविद्यालयाच्या प्राचार्यामार्फत समितीकडे सादर करावे, असे समितीच्यावतीने आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाला एल.ए.डी. महाविद्यालयाचे प्राचार्य ए.टी. लिहीतकर, कमला नेहरु महाविद्यालयाचे प्राचार्य बिडकर, प्राध्यापक श्रृती देशमुख, प्रा. डॉ. प्रगती भुरे, नोडल अधिकारी  आगाशे, गिरडकर, सरिता अनवाणे, भारती वडतीकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पालोरा येथे हाडपक्या गणपतीचे थाटात विसर्जन

Fri Sep 23 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी पारशीवनी:- पारशीवनी तालु्यातील पालोरा येथे बाल गणेश उत्सव मंडळ कुणबी मोहल्ला चे वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा हाडपक्या गणपती उत्सव दैनंदिन विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. आज २३ सप्टेंबर ला सकाळी दहा वाजल्यापासून गणपतीचे विसर्जन प्रसंगी भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. गावात विविध मार्गाने मिरवणूक काढून डी.जे.ढोल ताशांच्या गजरात तल्लीन होऊन महिला व पुरुष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com