– पेट्रोल 5 रु तर डिझेल वर 3 रु ची कपात
– राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा बोझा पडणार आहे
मुंबई – राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे.