सुदृढ आरोग्यासाठी राबविण्यात येत आहे राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम मनपा क्षेत्रात ४७५६२ मुलांना देण्यात आली जंतनाशक गोळी

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त शाळांमध्ये हजर असणाऱ्या मुला-मुलींना शिक्षकांव्दारे तसेच अंगणवाडीमध्ये शिक्षकांव्दारे एकुण ४७५६२ मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. १० ऑक्टोबर व मॉप अप दिन १७ ऑक्टोबर २०२२ रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे. १० ऑक्टोबर रोजी गोळी न घेतलेल्या १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना १७ ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.  जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहिमेमधील अंतर ६ महिन्यापेक्षा जास्त नसावे म्हणून मोहिमेची प्रथम फेरी माहे २५ एप्रिल २०२२ ते २ मे २०२२ दरम्यान राबविण्यात आली व व्दितीय फेरी माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये आयोजित करण्यात येत आहे.

१ ते १९ वयोगटातील बालकांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून परिसर स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे होतो. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण असून त्यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते. याकरिता राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुला – मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्यरक्षण, उत्तम पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्याचे उदि्दष्ट ठेवण्यात आले आहे.

जंताचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक गोळी घेण्याबरोबरच हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, भाज्या व फळे स्वच्छ धुवून खाणे, नखे नियामित कापणे व स्वच्छ ठेवणे, बाहेर जाताना बूट अथवा चपलांचा वापर करणे ही खबरदारी घेणेही आवश्यक आहे. ही मोहीम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे.

सदर गोळी खाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तथापि बालकाच्या शरीरामध्ये जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये.

NewsToday24x7

Next Post

मनपा सफाई कामगार निलंबित स्वच्छतेत निष्काळजीपणा भोवला

Tue Oct 11 , 2022
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत झोन क्र. १ येथील सफाई कामगार  किरण रामसिंग राठोड यांना स्वच्छतेच्या कामात निष्काळजीपणा करून कर्तव्यात हयगय व शिस्तभंग केल्याने निलंबित करण्यात आले आहे. सदर सफाई कामगार झोन क्र. १ येथे कार्यरत असुन त्यांच्याकडे संत कवलराम चौक ते विदर्भ हाऊसिंग चौक, दाताला रोड इत्यादीची झडाई, साफ सफाईची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. झडाई, साफ सफाई केल्यावर निघालेला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com