सुलोचना चव्‍हाण यांच्‍या निधनाने लावणीचा अभिजात सुर हरपला – सुधीर मुनगंटीवार

मुंबई :- लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्‍हाण यांच्‍या निधनाने लावणीचा अभिजात सुर हरपल्‍याची शोक भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.

बैठकीची लावणी किती समृद्ध असावी याचा वस्‍तुपाठ सुलोचना चव्‍हाण यांनी घालुन दिला होता. अनेक तमाशाप्रधान चित्रपटातून त्‍यांनी ठसकेबाज स्‍वरात लावण्‍या सादर केल्‍या. चपळ, फटकेबाज शब्‍दांना आपल्‍या आवाजाच्‍या, सुरांच्‍या माध्‍यमातून ठसका व खटका देण्‍याचे काम सुलोचना चव्हाण इतके कोणीही उत्‍तम करू शकलेले नाही. पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्‍या मुखड्याची सुरूवात ठसकेबाजच झाली पाहीजे, असे सुलोचना चव्हाण यांचे ठाम मत होते आणि याचा प्रत्‍यय त्‍यांनी गायलेल्‍या लावण्‍यांतून येतोच. सुलोचना चव्हाण लावणीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शास्‍त्रीय गायकीचे कोणतेही विधीवत शिक्षण न घेता दीर्घकाळ त्‍यांनी लावणीच्‍या माध्‍यमातून रसिकप्रेक्षकांच्‍या मनावर उमटविलेला ठसा कधीही विसरू शकणार नाही. त्‍यांनी गायलेल्‍या लावण्‍यांनी जनमानसांच्‍या हृदयात मानाचे स्‍थान मिळविले आहे. लावणीला राजमान्‍यता, लोकमान्‍यता व प्रतिष्‍ठा मिळवून देणाऱ्या सुलोचनाताईंच्‍या निधनाने या क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असल्‍याचे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्‍हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गौ सेवार्थ दिव्य श्री गौकृपा कथा 12 दिसंबर से, साध्वी श्रद्धा गोपाल सरस्वती सुनाएंगी गौ महिमा

Sat Dec 10 , 2022
नागपुर :- श्री सालासर सेवा समिति व श्री गौवंश सेवा संघ नागपुर के संयुक्त तत्वावधान में गौ सेवार्थ साप्ताहिक दिव्य श्री गौकृपा कथा का आयोजन किया गया है। यह आयोजन 12 दिसंबर से 18 दिसंबर तक श्री कामधेनु धाम, कच्छी वीसा प्रांगण, लकड़गंज में किया गया है। इसका समय दोपहर 2:30 से 5:30 तक का रखा गया है। श्री गौकृपा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com