व्हाईट लिस्ट आधार नोंदणी शिबीराचे आयोजन

गडचिरोली :- मागील १० वर्षात आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे ओळखीचे पुरावे म्हणून उदयास आलेले आहे. शासकीय, निमशासकीय व खाजगी योजनांचा, सेवांचा लाभ घेणेकरिता आधार कार्ड हे महत्वपूर्ण दस्तावेज आहे. आपली आधार माहीत अधिक बळकट करणे करिता प्रत्येक नागरिकाने आधार कार्ड दर 5 ते 10 वर्षानी अध्यवत करणे अनिवार्य आहे.

अशातच बायोमेट्रिक समस्येमुळे ज्या नागरिकांचे आधार कार्ड अध्यवत होत नाही किंवा नवीन आधार नोंदणी होत नाही अश्या नागरिकांकरीता जिल्हाधिकारी कार्यालय , गडचिरोली येथे दिनांक 31.01.2025 रोजी यू.आय.डी.ए.आय, प्रादेशिक कार्यालय मुंबई मार्फत व्हाईट लिस्ट आधार नोंदणी शिबीर चे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर मध्ये एकूण 24 नागरिकांचे व्हाईट लिस्ट आधार नोंदणी व अध्यवतीकरण करण्यात आले. सदर शिबीर करिता यू.आय.डी.ए.आय, प्रादेशिक कार्यालय मुंबई येथील सहाय्यक व्यवस्थापक विनय नागदिवे, तसेच जिल्हा आधार प्रकल्पाचे वरिष्ठ सहायक अभियंता राहुल बावणे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक सुनील मोकडे , आधार ऑपरेटर धिरज काटवे उपस्थित होते .

“बायोमेट्रिक समस्येमुळे ज्या नागरिकांचे आधार कार्ड अध्यवत होत नाही किंवा नवीन आधार नोंदणी होत नाही अश्या नागरिकांनी यू.आय.डी.ए.आय हेल्प लाइन क्रमांक १९४७ वर तक्रार नोंदवावी किंवा जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे संपर्क करावे

– राहुल बावणे , वरिष्ठ सहायक अभियंता , आधार प्रकल्प , जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली ”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विभागीय सरस प्रदर्शनीला सर्वानी भेट देवून महिलांना प्रोत्साहन द्यावे- राजेंद्र एम.भुयार

Sat Feb 1 , 2025
गडचिरोली :- विभागीय सरस प्रदर्शनीसाठी नागपुर विभागातील नागपुर, चंद्रपुर, गडचिरोली, गोदिंया भंडारा, वर्धा या जिल्हयातील 180 स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे व पदार्थाचे विक्री व प्रदर्शनीमध्ये ग्रामिण भागातील अस्सल गावरान पध्दतीच्या विविध पदार्थाची चव चाखयला मिळत आहे. या शिवाय लाकडी वस्तु, दागीने, ड्रेस मटेरिअल, घरगुती मसाले, गावरान दाळी, कुरडया, पापडया, आंबा लोनचे, मच्छी लोनचे, व्हेज नॉव्हेज जेवणाची दुकाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!