धुलीवंदन च्या दिवसी मारहाण करून जख्मी केल्याने तीन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस दिड कि मी अंतरावरील रायनगर विकास शाळा मैदाना जवळ विवेक मेश्राम च्या नौकरा ला तीन आरोपींनी मारहाण करून जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
             प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.१८) मार्च २०२२ ला दुपारी १.४५ वाजता दरम्यान विवेक गुप्त पाल मेश्राम वय ३६ वर्ष राह. इंदिरा नगर कन्हान हा आपल्या घरी जेवन करीत असतांना त्यास त्याचा नौकर दुर्गेश कैथवार यांनी फोन करून सांगितले कि,  मला आरोपी १) अनुराग मेश्राम २) पवन मेश्राम हे मारहाण करीत सांगितल्याने विवेक मेश्राम हा लगेच विकास शाळा मैदान जवळील रायनगर कन्हान येथे गेला असता तिथे दुर्गेश कैथवार हा जख्मी अवस्थेत होता त्याला नाकाला, तोंडाला मार लागला होता. त्यास सोबत घेऊन समझौता करण्यासाठी शहिद चौक हनुमान नगर येथे गेले असता ते विकास शाळा रायनगर येथील मैदानात असल्याचे कळल्याने विवेक  मेश्राम हे तिथे गेला असता अनुराग मेश्राम, पवन मेश्राम व त्याचे वडील राजेंद्र मेश्राम व त्याची आई जोस्त्ना मेश्राम हे होते. विवेक मेश्राम ने झगडा भांडण करण्याचे कारण विचारले असता त्यांनी संगणमत करून राजेंद्र मेश्राम यांनी विवेक मेश्राम यांना बासाचा दंड्याने डोक्यावर, डाव्या हाताच्या मनघटावर मारून गंभीर जख्मी केले. तसेच मदतीला आलेले अभी नागपुरे व नितिन खोब्रागडे यांना सुद्धा दंड्याने व हात बुक्याने मारपीट करून जख्मी केले. आणि जिवाने मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी विवेक गुप्तपाल मेश्राम यांच्या तोंडी तक्रारीवरून तीन आरोपी अनुराग मेश्राम, पवन मेश्राम व त्याचे वडील राजेंद्र मेश्राम च्या विरुद्ध अप क्र.१५०/२०२२ कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.
Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com