संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी – प्रभाग 15 तील रामगढ भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे संतप्त महिलांनी आज दुपारी नगर परिषदेत धडक देऊन भाजपा महामंत्री उज्वल रायबोले यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना निवेदन सोपविले संतप्त महिलांच्या भावना लक्षात घेऊन मुख्याधिकारी बोरकर यांनी पाणी पुरवठा अधिकारी अवि चौधरी यांना कक्षात बोलाऊन आवश्यक निर्देश दिले.
रामगढ भागातील जवलपास 40 ते 50 घरांना गेले 5 महिन्या पासुन कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे,माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी तीनदा मुख्याधिकाऱ्याना लेखी तक्रार करून पाणी टंचाई समस्या सोडविण्याची मागणी केली होती आता उन्हाळा सुरु झाल्याने कमी दाबाच्या पाणी पुरव ठ्या मुळे पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात प्रिती ऊके, आकांशा राव, प्रभा गराटे, सरला रामटेके, ममता मोहड, किरण बावने, सुनिता अटराये, रेखा नारनवरे, सुमन काटे, संध्या भिमटे, वच्छला दमाहे, ललिता काटे, ललिता भगत यांचा समावेश होता