‘म्हाडा’ने घरांच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या ३१२० सदनिकांची सोडत 

मुंबई :- प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. त्यानुसार ‘म्हाडा’ने घरांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे मंडळातर्फे म्हाडा गृहनिर्माण योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेतील ३ हजार १२० सदनिकांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने – पाटील, ओव्हरसाइट समिती अध्यक्ष एम. एम. पोतदार, उपायुक्त दीपक नलावडे, समिती सदस्य धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की अन्न, वस्त्र याबरोबरच निवारा आवश्यक आहे. रोजगारासाठी शहरी भागात नागरिक येतात. त्यांना माफक आणि परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देताना किमान सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी म्हाडाने आपल्या प्रकल्पांना गती द्यावी. तसेच बांधकामाची गुणवत्ता राहील याची दक्षता घ्यावी. अधिकाधिक घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाने नियोजन करीत लवकरात लवकर घरांच्या सोडती काढाव्यात.

पुणे मंडळामार्फत काढण्यात येत असलेल्या ६ हजार ५८ सदनिकांसाठी ५८ हजार ४६७ अर्जदारांनी अर्जाची अनामत रक्कम भरून सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यातील २ हजार ९३८ सदनिका या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या. ३ हजार १२० सदनिकांसाठी ५५ हजार ८४५ अर्ज प्राप्त झाले.

एकूण सदनिका – ६०५८

एकूण प्राप्त अर्ज – ५८४६७

म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना सदनिका- २९३८

२० टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजना – २४८३

प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) – ६३७

एकूण सदनिका – ३१२०

एकूण प्राप्त अर्ज – ५५८४५

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेसा पिपला के सीईओ नंदनवार का हलबा समाज ने किया सत्कार

Mon Mar 20 , 2023
नागपूर :- बेसा पिपला नगर पंचायत के मुख्य कार्यकारी अधिकारी भारत नंदनवार के गावों में उत्कृष्ट कार्यों के सम्मान में हलबा समाज की ओर से पुष्पगुच्छ देकर सत्कार किया गया. कार्यक्रम में सामाजिक कार्यकर्ता नत्थु निनावे, राम नंदनवार,जगन्नाथ धमदे,ताराचंद बहारघरे,दामोदर खरबीकर, भनारकर, श्याम खापेकर, सोनकुसरे, कुहीकर सहित समाज के अनेक लोग उपस्थित थे. Follow us on Social Media x facebook […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com