मनपा वसुली पथकाद्वारे थकबाकीदाराच्या स्थावर मालमत्तेवर वारंट कार्यवाही 

नागपूर :- दि २५/११/२०२३ शनिवार रोजी थकित मालमत्ता कर रक्कम वसूल करणेकरीता झोन क्र.१ लक्ष्मी नगर च्या वसुली पथकानी पाच थकबाकीदाराच्या स्थावर मालमत्ता वर वारंट कार्यवाही अंतर्गत जप्त व अटकावणी चा प्रयत्न करुन रु ३ लक्ष ची वसुली केलेली आहे व तीन स्थावर मालमत्ता जप्त व अटकावणी केलेल्या आहेत.

प्रत्येक आर्थिक वर्षा करीता मालमत्ता कर रक्कम निहीत दिनांका पुर्वी नागपुर महानगपालिका निधीत जमा करणारया मालमत्ताधारकास / ईमलाधारकास/ भोगवटादारास मालमत्ता कर रक्कमेत १०-५ % सुट देवुन संबधित मालमत्ताधारकाचे / ईमलाधारकाचे/भोगवटाधारकाचे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आभार व्यक्त केल्या जात आहे.

परंतू ज्या मालमत्ताधारकाना/ईमलाधारकाना/भोगवटादाराना थकित मालमत्ता कर नागपूर महानगरपालिका निधीत जमा करणेची संधी उपलब्ध करुन देवून सुद्धा त्या मालमत्ताधारक/ईमलाधारक/भोगवटादार द्वारा दखल घेतल्या जात नाही अशा मालमत्ताधारक/ ईमलाधारक/भोगवटादार कडून थकित मालमत्ता कर रक्कम वसुल करणेची जबर कार्यवाही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम १२८ च्या तरतुदी अतंर्गत मालमत्ता कर विभाग म न पा द्वारा आयुक्त तथा प्रशासक , मा.अति आयुक्त (शहर) यांचे मार्गदर्शनात सुरु करण्यात आलेली आहे.

मालमत्ता कर थकबाकीदारानी आपली स्थावर/जगंम मालमत्ता जप्ती व अटकावणी पासून वाचविणेकरीता , जाहीर लिलाव पद्धतीने विक्री होणेपासून वाचविणेकरीता थकित मालमत्ता कर रक्कम ३० नोव्हेंबर २०२३ पुर्वी नागपुर महानगरपालिका निधीत जमा करणेचे सुचित करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रहार मिलिटरी स्कूल रंगवणार फुटबॉल आणि हँडबॉल स्पर्धा

Mon Nov 27 , 2023
नागपूर :- प्रहार मिलिटरी स्कूल रंगवणार फुटबॉल आणि हँडबॉलचे सामने सीपी अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत प्रहार मिलिटरी स्कूल तर्फे येत्या 28 नोव्हेंबर पासून तर 1 डिसेंबर पर्यंत स्वामी विवेकानंद फुटबॉल चॅम्पियशिप (धनवटे नॅशनल कॉलेज, काँग्रेसनगर, नागपूर ) च्या मैदानावर आयोजित केलेली आहे. तसेच 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान स्वामी विवेकानंद हँडबॉल चॅम्पियनशिप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!