संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
-12 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी
कामठी ता प्र 10 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील एका 22 वर्षीय तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तरुणास नवीन कामठी पोलिसांनी काल 9 जानेवारीला रात्री 9 दरम्यान अटक केली असून अटक खंडणीबहाद्दूर आरोपीचे नाव अभिलाष दिलीप भोतमांगे वय 28 वर्षे रा नया नगर कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभिलाष दिलीप भोतमांगे ची कामठी – कळमना मार्गावरील एका 28 वर्षीय तरुणी सोबत एक वर्षापासून मैत्री होती. मैत्री असताना दोघांनी एकमेकांसोबत काढलेल्या फोटो आरोपीकडे जमा असून सदर मैत्रिणीचे तिच्या समाजातील तरुणा सोबत नुकतेच लग्न जुडले असून साक्षगंध सुद्धा झाले याची माहिती आरोपीला मिळताच आरोपीने सदर तरुणीला तुझे लग्न तोडून देईल अशी भीती दाखवून तिच्याकडून जयभीम चौक कामठी येथील माया पाटील यांच्या घरी 50 हजार रुपये घेतले यातही त्याचे समाधान न झाल्याने अजून 50 हजार रुपयाची मागणी केली.यावर तरुणीने नकार दिल्याने आरोपीने पीडित फिर्यादी तरुणीसोबत पूर्वी काढलेले फोटो सदर तरुणीच्या होणाऱ्या पतीला पाठवून त्याला फोन करून पूर्वीच्या संबंधाची माहिती दिली यावर होणाऱ्या पतीने त्या तरुणीशी लग्न तोडले. यावर आरोपी अभिलाष दिलीप भोतमागे च्या सततच्या खंडणी मागण्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने नवीन कामठी पोलीस स्टेशनला तक्रार केली असता पोलिसांनी आरोपी अभिलाष भोतमांगे विरुद्ध भादवी कलम 384, 385 अनव्ये गुन्हा दाखल करून अटक केली .त्याला कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बारा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे .पुढील तपास नवीन कामठीचे ठाणेदार भरत क्षीरसागर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे करीत आहेत.