समता सैनिक दलाची, नवीन शिक्षण धोरण विरोधी परिषद

नागपूर :- समता सैनिक दल व फुले आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी- पालक संघटना च्या वतीने 15 व 16 एप्रिल ला राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 या विषयावर कामठी रोड वरील नागलोक येथे दोन दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

2014-15 साली RSS प्रणित भाजप सरकार सत्तेवर आल्यावर शिक्षणाच्या ब्राह्मणी करणची योजना आखून 2020 ला ब्राम्हणी विचारांचे राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केले. 2023 या वर्षीपासून त्याला अमलात आणले. त्या ब्राम्हणी शिक्षण धोरणाचा भंडाफोड करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

दुसऱ्या दिवशीच्या चर्चासत्रात ब्राह्मणी शिक्षण व्यवस्थेची मूलतत्त्व या विषयावर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय समन्वयक प्रदीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र झाले. या विषयावर महाराष्ट्र राज्याचे निवृत्त माहिती संचालक भिक्खु महेंद्र कौसल, बसपाचे मिडिया प्रभारी उत्तम शेवडे, सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकरी अभ्यासक प्रदीप मुन यांनी प्रमुख वक्ते म्हणून आपली भूमिका मांडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चार वर्षीय मुलीच्या पित्यावर बेरोजगार होण्याची वेळ

Thu Apr 20 , 2023
‘कंत्राटदार बदलला तरी कंत्राटी कामगार बदलणार नाही’ याचा विसर वीज केंद्रात परप्रांतीय कंपन्यांकडून स्थानिक कामगारांचा छळ महानिर्मिती उपमुख्य (इंधन व्यवस्थापन) विद्युत भवन, नागपूर कार्यालयाचे दुर्लक्ष भुषण चंद्रशेखर यांचेकडून मदतीचा हात नागपूर :- परप्रांतीय कंपनीच्या मनमर्जी कारभारामुळे चार वर्षीय मुलीच्या कंत्राटी कामगार पित्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली. न्याय मिळवून देण्यासाठी या कामगाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांचेकडे मदतीसाठी धाव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com