नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहातील देखभाल दुरुस्तीच्या संदर्भात आढावा घेतला. मंत्री महोदयांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सभागृहात प्रेक्षक व कलावंतांच्या विरंगुळ्यासाठी आणखी काही उपक्रम राबविता येतील का, यावरही चर्चा झाली. या बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांची उपस्थिती होती. सभागृहातील ध्वनी व्यवस्था, आसनव्यवस्था, रंगमंचावरील प्रकाशव्यवस्था, पार्किंगची व्यवस्था आदींवर यावेळी चर्चा झाली. यासोबतच सभागृहाच्या परिसरात कलावंत व प्रेक्षकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने काही उपक्रम सुरू करता येतील का, याचाही विचार करण्यास त्यांनी सांगितले. ‘कवीवर्य सुरेश भट सभागृह लोकांसाठी उभारण्यात आले आहे. नागपुरातील प्रत्येक कलावंताला हक्काचा रंगमंच मिळावा, यादृष्टीने त्याचे भाडेही कमी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षक व कलावंतांच्या सोयीच्या दृष्टीने पावले उचलावी,’ असे ना. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडून सुरेश भट सभागृहाच्या देखभाल-दुरुस्तीचा आढावा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com