एका कचक्यात मोठा गेम होणार?, मनोज जरांगे आणि संभाजी ब्रिगेडमध्ये काय ठरलं?

अंतरवली :- विधानसभा निवडणुकीच्या तारखा झाल्यापासून अंतरवली सराटीला अधिक महत्त्व आलं आहे. सर्वच राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार, माजी आमदार आणि विद्यमान आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. कोणी मध्यरात्री गुपचूप भेटायला येत आहे, तर कोणी पहाटे पहाटे भेटायला येत आहे. प्रत्येकजण आपली बाजू कशी भक्कम आहे, आपण कसे योग्य उमेदवार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनीही जरांगे यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकं काय घडलं? दोघे मिळून एकत्र निवडणूक लढणार की अंडरस्टँडिंग ठेवून उमेदवार देणार? याबाबतची माहिती माजी मंत्री बदामराव पंडित यांनी दिली आहे.

बदामराव पंडित यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. संभाजी ब्रिगेड हे एक संघटन आणि राजकीय पक्ष आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश व्हावा तसेच ओबीसींचे संरक्षण व्हावे हे मुद्दे घेऊन संभाजी ब्रिगेड गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. तीच भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे, अशी माहिती बदामराव पंडित यांनी दिली आहे.

आपला झेंडा, आपला अजेंडा हवा

विधानसभेत आपली माणसं पाठवायची असेल आणि आपले प्रश्न मार्गी लावायचे असेल तर समविचारी लोकांशी चर्चा करून राजकीय भूमिका घेतली पाहिजे. आपला झेंडा, आपला अजेंडा ही भूमिका पाहिजे. याबाबत पुढे निर्णय होईल आणि त्या अनुषंगाने पुढे वाटचाल चालू होईल, अशी माहितीही बदामराव पंडित यांनी सांगितलं.

समन्वय चांगला

जरांगे पाटील आणि आमचा समन्वय चांगला आहे. मात्र या लोकशाहीच्या महोत्सवात आम्ही स्वतंत्र सामील होणार आहोत, असं संभाजी ब्रिगेडने आधीच जाहीर केलं आहे. मनोज जरांगे यांनीही तसंच जाहीर केलं आहे. पण उमेदवार दिल्याशिवाय पर्याय नाही. जी भूमिका जरांगे पाटलांची आहे, तीच भूमिका आमची आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ठरवून उमेदवार देऊ

विधानसभेत समाजाचे प्रश्न मांडणारे लोक गेले पाहिजे. योग्य उमेदवार देण्याबाबत आम्ही सविस्तर करणार आहोत. जरांगे पाटील यांच्याकडेही आणि आमच्याकडेही उमेदवार येतात. परंतु आम्ही ठरवून उमेदवार देणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

Credit by tv9 marthi

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रात सर्वच पक्षांत घराणेशाहीची सरशी; उमेदवारी याद्या काय सांगतात?

Thu Oct 24 , 2024
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील चित्र पाहिले तर राजकीय निष्ठा, विचारसरणी, तत्त्व याला दुय्यम स्थान आल्याचे दिसते. उमेदवारीसाठी सोयीची पक्षांतरे, एकाच घरात दोन पक्ष हे आता नवीन नाही. आमदार होण्याच्या इर्षेपायी विचार दुय्यम ठरलेत. राजकीय पक्षांची उमेदवारी यादी पाहिली तर घराणेशाही मोठ्या प्रमाणात आहे. त्याला कोणताही पक्ष अपवाद नाही. उमेदवारी दिल्यानंतर त्याचे समर्थन करण्यासाठी संबंधित तो किंवा ती पक्षात काम करत असल्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!