भारतात सशक्त, स्वदेशी आणि स्वावलंबी डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला साकार करण्याच्या दिशेने ‘‘BharOS’’ हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
नवी दिल्ली :- केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय रेल्वे, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह आज ‘‘BharOS’’ या आयआयटी मद्रास या संस्थेने विकसित केलेल्या स्वदेशी मोबाईल परिचालन प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली.
केंद्रीय मंत्री प्रधान म्हणाले की, देशातील गरीब जनता सशक्त, स्वदेशी, जबाबदार आणि स्वावलंबी डिजिटल पायाभूत सुविधांची मुख्य लाभार्थी असणार आहे. ते पुढे म्हणाले की, ‘संपूर्णतः सरकार’ दृष्टीकोनासह,धोरण कर्त्यांना प्रोत्साहन देणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेला प्रयोग आहे. ‘‘BharOS’’ हा उपक्रम म्हणजे माहितीच्या गोपनीयतेच्या दिशेने उचललेले यशस्वी पाऊल आहे असे त्यांनी पुढे सांगितले.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान पुढे म्हणाले की ‘‘BharOS’’ या स्वदेशी मोबाईल परिचालन प्रणालीची यशस्वी चाचणी म्हणजे भारतात सशक्त, स्वदेशी आणि स्वावलंबी डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला साकार करण्याच्या दृष्टीने विकसित केलेला अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे.