नवी दिल्ली :- भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान देणारे आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा उभारणारे क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रूपिंदर सिंग यांनी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून उमाजी नाईक यांना आदरांजली वाहिली.