यवतमाळ :- येथील समता मैदानात आयोजित कृषी महोत्सवात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत खरेदी विक्री संमेलन घेण्यात आले. संमेलनात जिल्ह्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतील सर्व लाभार्थी त्यांच्या उत्पादनासह तसेच त्यांच्या उत्पादनांना योग्य प्रकारे बाजार उपलब्ध होण्यासाठी विविध खरेदीदार उपस्थित होते.
याप्रसंगी खरेदीदार व लाभार्थी यांच्यामध्ये विविध घटकांवर चर्चा झाली व लाभार्थ्यांच्या उत्पादनांना योग्य भावात बाजार कसा उपलब्ध होईल व त्यासाठी लाभार्थ्यांनी काय करणे गरजेचे आहे, यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी उत्पादनाचे ब्रँडिंग, मार्केटिंग व प्रसिद्धी याबद्दल यावेळी मार्गदर्शन केले.
संमेलनाप्रसंगी कृषी उपसंचालक तेजस चव्हाण, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अतुल इंगळे, जिल्हा अग्रणी बँक सहाय्यक निशिकांत ठाकरे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे तंत्र अधिकारी अविनाश सूर्यवंशी, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा.प्रदीप थोरात, निखिल सोळंके, प्रशांत नाईकवाडी, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मानकर, तंत्र सल्लागार देवानंद खांदवे उपस्थित होते.
तसेच खरेदीदार आनंद रानडे, शशांक केंडे, विकास मधाचे संचालक विकास क्षीरसागर, क्षेत्रीय अधिकारी तथा तंत्र सहाय्यक आकाश पत्रे, जिल्हा संसाधन व्यक्ती मिलिंद कांबळे, सतीश इंगोले, सारंग गिरी, किशोर आवारी, अमोल राऊत, मिथुन चांदेकर, महेश पुडरवार, सुमित राऊत, अभिजीत घरडे, संकेत अघमे, मनीषा गाडगे, गौकर्णा पाईकराव, उपजीविका सल्लागार पायल राऊत आदी उपस्थित होते.