सर्वांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आगामी सण/धर्मिक उत्सव साजरे करावे – बापूसाहेब रोहम

– सण/धर्मोत्सव साजरे करतांना शासन/प्रशासनाचे पालन करा पोलीस विभागाचे नागरिकांना आवाहन

– कोंढाळी पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न

कोंढाळी :- कोंढाळी पोलीस स्टेशन चे वतीने १२मार्च रोजी साकाळी 11.30वाजता कोंढाळी पोलीस स्टेशन चे परेड ग्राऊंडवर शांतता समितीची बैठक संपन्न झाली. ही शांतता समितीची बैठक आगामी, सण, धर्मिक उत्सव‌ शांततेत व्हावे,या प्रसंगी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत होळी/रंगपंचमी, रामनवमी, रमजान ईद आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्री हनुमान जयंती या सर्व धर्मिय उत्सवानिमित्त्या सह इतर सणांबाबत कोंढाळी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात काटोल उपविभागीय पोलिस अधिकारी बापू साहेब-रोहोम यांच्या अध्यक्षतेखाली व कोंढाळीचे पोलीस चे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली.

कोंढाळी नागरी क्षेत्रासह कोंढाळी पोलीस स्टेशन चे सर्वच गावे शांतते साठी सुप्रसिद्ध आहे.सर्वधर्मियांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आगामी सर्व धार्मिक, सामाजिक सण, धर्मोत्सव, साजरे करावे असे उपविभागीय पोलिस अधिकारी (काटोल) बापू साहेब-रोहोम यांनी कोंढाळी नगर सह कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता समितीचे पदाधिकारी, सर्व पोलीस पाटील, धार्मिक व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थितांना केले.

शांतता कमेटी च्या चर्चेदरम्यान या महिन्यातील होळी/रंगपंचमी, चैत्र राम नवमी, रमजान ईद, तसेच पुढील महिन्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि हनुमान जयंती या धार्मिक सणांच्या निमित्ताने आपल्या भागात शांतता राखण्याबाबत यावेळी उपस्थित शांतता समितीची चे लोकप्रतिनिधींसमोर राज्य शासन व प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती देऊन आवश्यक चर्चा करण्यात आली. कोंढाळीसह संपूर्ण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार त्रिपाठी यांनी केले असून, शासन प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सर्व सण शांततेत साजरे करावेत, असे आवाहन करण्यात आले.

अफवा पसरवणाऱ्यांवर प्रशासन आणि पोलीस करडी नजर ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले. या शांतता कमेटीचे बैठकी दरम्यान उपस्थितांकडून त्यांच्या पोलीस स्टेशन परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सूचना मागविण्यात आल्या, यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली.

यावेळी कोंढाळी चे याकूब (प्यारू ) पठाण, सुरेंद्र भाजिखाये,ताजी मौलाना, शेख नुर महंमद शेख, नितीन पाटील ठवळे, अफसर हुसेन सह सामाजिक, धार्मिक, शांतता कमेटी ‌चे पदाधिकारी व कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व पोलीस पाटील सह पो.उ.नि.धवल देशमुख, शेख सलीम, रोशन खांडेकर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

पो ना शी (खुपीया) प्रशांत निभोरकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Thakre raised RL Scam; NIT can regularize unauthorized plots also on reservation lands

Wed Mar 12 , 2025
Nagpur :- Vikas Thakre, MLA from West Nagpur and President of Nagpur City (District) Congress Committee has raised Regularization Letter (RL) Scam in Legislative Assembly during ongoing budget session on Tuesday and also problems being faced by hundreds of citizens due to lack of regularization of their unauthorized houses and plots under Gunthewari Act. The State Government announced that the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!