नागपूर :- आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमीत्त राज्य माहिती आयुक्त कार्यालय येथे उद्या गुरुवार दि.२8 सप्टेंबर रोजी सकाळी ११.30 वाजता ‘माहिती अधिकार दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.
जूने सचिवालय परिसरातील नवीन प्रशासकीय भवन, पहिला माळा येथे ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस’ विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या प्रमुख उपस्थिती साजरा होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती आयुक्त राहुल पांडे राहणार असून मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्त अजय गुल्हाने हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘माहितीचा अधिकार जनतेचा अधिकार’ याअंतर्गत नागपूर विभागात सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात माहितीच्या अधिकाराबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त नवीन प्रशासकीय भवन, इमारत क्रमांक दोन, पहिला माळा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य माहिती आयुक्तालयाच्या उपसचिव रोहिणी जाधव यांनी केले आहे.