– गुन्हेशाखा युनिट क. १ पोलीसांची कामगिरी
नागपूर :- पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत, फ्लॅट नं. ६, अंजली अपार्टमेंट, त्रिमुर्ती नगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी शितल हरीदास लोखंडे, वय २६ वर्षे यांनी बिल्डींग चे पाकींग मध्ये त्यांची हिरो सुपर स्प्लेंडर माडी क. एम. एच. ३४, बि. एम. ३१२६ किंमती अंदाजे ३५,०००/-रु. ची हन्डल लॉक करून पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची नमुद गाडी चोरून नेली. अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस ठाणे प्रतापनगर येथे कलम ३७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाच्या समांतर तपासादरम्यान, गुन्हेशाखा युनिट क. १ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून तसेच तांत्रीक तपास करून आरोपी नामे अविनाश प्रभाकर मसराम, वय ३६ वर्षे, रा. गंगानगर, पो. ठाणे गिट्टीखदान, नागपुर वास ताब्यात येवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद दुवाको गाडी चोरी केल्याचे कबुल केले. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात चोरी गेलेले वाहन किंमती अंदाजे ३५,०००/- रू. जप्त करण्यात आले. आरोपीस अधिक सखोल विचारपुस केली असता, त्याने पोलीस ठाणे बजाजनगर हद्दीतुन एक डिओ मोपेड गाडी क. एम.एच. ३१, एफ. पी. ९२०५ किंमती अंदाजे ७०,०००/- रू. ची चोरी केल्याची कबुली दिली. त्याचे ताब्यातुन दोन्ही गुन्ह्यातील वाहने एकुण किंमती १,०५,०००/- रू. या मुद्देमाल जप्त करून, दोन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले. आरोपी हा वाहन चोरीचे गुन्हे करण्याच्या सवईचा असुन त्याचेवर वाहन चोरीचे एकुण ५ गुन्हे दाखल आहेत. आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाई कामी प्रतापनगर पोलीसांचे ताब्यात दिले आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शनात, युनिट क. १ चे पोनि सुहास चौधरी, सपोनि सचिन भोंडे, पोहवा रितेश तुमडाम, सुमित गुजर, हेमंत लोणारे, नापोअं. उमेश टेकाम, सुशांत सोळंकी, योगेश सातपुते, शरद चांभारे, पोअं रविद्र राऊत, व नितीन मोपुलकर यांनी केली.