अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असता, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस ठाणे कळमना ह‌द्दीत दिनबंधु सोसायटी, पांडुरंग नगर, प्लॉट नं. ८५, गुलशन नगर, कळमना, नागपुर येथे राहणारा आरोपी नामे मोहम्मद फिरोज वल्द मोहम्मद आबिद अन्सारी, वय २४ वर्षे, याचे राहते घराची घरझडती घेतली असता, आरोपीचे ताब्यातुन एक लोखंडी देशी बनावटीची पिस्टल मॅगझीनसह व मॅगझीन उपटुन पाहीली असता, त्यामध्ये दोन जिवंत काडतुस मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यातुन एकुण किंमती ३२,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस पिस्टल बाबत विचारपुस केली असता, त्याने नमुद पिस्टल हे आरोपी क. २) करीम राजा वल्द मोहम्मद युनुस, वय २४ वर्षे, रा. जुना कामठी रोड, गदीमा मस्जीद मेमन कॉलोनी, कळमना, नागपुर याचेकडुन घेतल्याचे सांगीतले. त्याला सुध्दा ताब्यात घेवून विचारपुस केली असता, त्याने नमुद पिस्टल आरोपी क. ३) मोहम्मद शाकीब उर्फ पटेल मोहम्मद सि‌द्दीकी, वय २८ वर्षे, रा. संजीवनी कॉलोनी, क्वॉर्टर नं. ४५/१२, यशोधरानगर, नागपुर यानी दिल्याचे सांगीतले त्याचा शोध घेवुन ताब्यात घेतले व विचारपुस केली असता, त्याने नमुद पिस्टल हे पाहीजे आरोपी क. ४) अब्दुल सोहेल उर्फ सोबु, रा. सतरंजीपुरा, लकडगंज, नागपुर ५) अजहर नावाचा इसम, रा. निजामु‌द्दीन कॉलोनी, यशोधरानगर, नागपुर यांचेकडुन प्राप्त केल्याचे सांगीतले. आरोपीविरुध्द गुन्हे शाखा युनिट क. ३ ये पोउपनि नवनाथ देवकाते यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे कळमना येथे कलम ३. २५ भा.ह.का. सहकलम १३५ म.पी. का. अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी क. १ ते ३ यांना अटक करण्यात आली आहे. पाहीजे आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई कामी कळमना पोलीसांचे ताब्यात दिले आहे. पुढील तपास सुरू आहे

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शनात, युनिट क. ३ वे पोनि मुकुंद ठाकरे, पोउपनि, नवनाथ देवकाते, सफौ. मिलींद चौधरी, ईश्वर खोरडे, पोहवा, प्रविण लांडे, अमोल जासूद, नापोअं. संतोष चौधरी, पोअं मनिष रामटेके व अनिल बोटरे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस, आरोपीस अटक

Thu Apr 4 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे सोनेगाव हद्दीत, जयप्रकाश नगर मेट्रोस्टेशन, नागपूर येथे फिर्यादी प्रणय अशोक भजणे, वय २५ वर्षे, रा. परीक्षम अपार्टमेंट जवळ, नरेंद्र नगर, नागपुर यांनी आपली हिरो होंडा शाईन गाडी क. एम. एच. ३५, ए.वि. ३६२७ किंमती अंदाजे ३०,०००/-रु. ची हॅन्डल लॉक करून पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची नमुद गाडी चोरून नेली. अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com