अमरदिप बडगे, प्रतिनिधी
एकाचा मृत्यू तर 6 प्रवासी जखमीची माहीती
गोंदिया :- जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातुन जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 गोंदिया ते कोहमारावर आज सकाळी 9 वाजता दरम्यान दोन वाहनात अपघात झाला असून काळी पिवळी आणि ट्रक मध्ये हा अपघात झाला आहे. वाहनातील एक प्रवासी अपघात दरम्यान जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. त्यातच वाहनात बसलेले अन्य 6प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
घटनास्थळी महामार्ग पोलीस उपस्थित झाले असून घटनेचा तपास सुरू आहे. डव्वा, पाटेकुर्रा गावाजवळ मुख्य मार्गावर हा अपघात झाला आहे. मृतक नामे : श्याम शंकर बंग ता. गोरेगाव वय वर्ष 70 असे असून या वाहनात 7 लोक सवार होते. एक प्रवासी मृत झाला असून 6 प्रवासी जखमी झालेले आहेत.
यात दोन लोकांची गंभीर प्रकृती आहे. काली पिवळी वाहन क्र: ,MH36- 3111 असे असून हे कोहमारा वरून गोंदिया कडे जात होते तर ट्रक क्रमांक MH 40 Y8487 गोंदिया कडून कोहमारा कडे येत होते. दरम्यान डव्वा जवळ हा अपघात झाला. जखमींना उपचाराकरिता हलविण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास डूग्गीपार आणि महामार्ग पोलीस करीत आहेत.