मुंबई :-माजी उप मुख्यमंत्री, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंती निमित्त गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानात मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली. भाजपा मुंबई अध्यक्ष, आ.आशिष शेलार, सरचिटणीस संजय उपाध्याय यांच्या प्रमुख उपस्थितीत वॉटर कुलरचे लोकार्पण, सफाई कामगारांचा सत्कार असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
मुंबई पोलीस आयकॉन अचिव्हर अवॉर्ड २०२२ दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते सुधीर कुडाळकर, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड तसेच माउंट अमा दब्लम सर करून अश्विसनीय कामगिरी करणाऱ्या पंखील हरीश छेडा यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट दिली.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, मंडल अध्यक्ष अरविंद यादव, माजी नगरसेवक जितेंद्र पटेल, जगदिश ओझा, विद्यार्थी सिंह, श्रीकांत पांडे, युवा मोर्चाचे अमर शहा, श्रीधर पाटील, वृषाली बागवे तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.