खापरखेडा बाह्य वळण मागावर ट्रक दुचाकी अपघातात तिघे जण गंभीर जख्मि

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 20:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खापरखेडा बाह्य वळण मार्गावर खापरखेडा हुन भरधाव वेगाने नागपूर कडे जाण्यास येत असलेल्या ट्रक ने खापरखेडा कडे जात असलेल्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत घडलेल्या अपघातात तीन दुचाकीस्वार मित्र जख्मि झाल्याची घटना आज दुपारी 3 दरम्यान घडली असून घटना घडताच आरोपी ट्रकचालकाने ट्रक घटनास्थळी सोडून घटनास्थळाहून पळ काढण्यात यश गाठले. या घटनेतील जख्मि मजूर मित्रांपैकी गंभीर जख्मि अतुल सेलोकर वय 25 वर्षे रा भांडे प्लॉट सक्करदरा नागपूर च्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याने नागपूर च्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले तर इतर दोन मित्र विशाल आलूलकर वय 35 वर्षे रा हुडकेश्वर नागपूर तसेच रवींद्र कोकाटे वय 42 वर्षे रा भांडे प्लॉट हे जख्मि असून आशा हॉस्पिटल कामठी येथे उपचारार्थ दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर दुचाकीस्वार हे रंगरंगोटी चे कामे करीत असून खापरखेडा गावातील रंगरंगोटी चे कंत्राटी पद्धतीने घेतलेले काम करण्यास्तव राहण्याची सोय करण्यासाठी हे तिघेही मित्र आज दुपारी 3 दरम्यान नागपूर हुन खापरखेडा बाह्य वळण मार्गे खापरखेडा कडे दुचाकी क्र एम एच 27 एन 9636 ने जात असता खापरखेडा हुन नागपूर कडे सदर घटनास्थळ मार्गे जात असता ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीला दिलेल्या धडकेत गंभीर अपघात घडला.सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी तीन कामगार मित्र जख्मि झाले .घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने पोलीस पथकासह घटनास्थळ गाठून आरोपी ट्रक चालकाविरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदवित जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेवर केलेक्या आक्षेपकर्त्यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी

Fri May 20 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 20 :- सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देत येत्या दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले होते तसेच राज्य निवडणूक आयोगाने आदेशीत केलेल्या सुधारित प्रभाग रचना कार्यक्रम 2022 नुसार कामठी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी कामठी नगर परिषद तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर इच्छुक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com