कमला नेहरू महाविद्यालयातील 12 वी च्या विद्यार्थ्याचे घवघवीत यश

नागपूर :- स्थानिक कमला नेहरू महाविद्यालयाच्या 12 वी च्या विज्ञान, कला, वाणिज्य व व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी प्राविण्य प्राप्त गुणवत्तेमध्ये उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा 94.28% निकाल, वाणिज्य शाखेचा 84.12%, कला शाखेचा 82.22% तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा 90.19% निकाल लागलेला आहे. वाणिज्य शाखेत 08 विद्यार्थी प्राविण्य प्राप्त असून महाविद्यालयातून प्रथम येणारी स्वानंदी राकेश बोरकर हिने 93.50% गुण प्राप्त केले आहे. विज्ञान शाखेत रेवा राजीव पोटदुखे या विद्यार्थिनीने 88.17% गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कला शाखेत खुशी अतुल वानखेडे या विद्यार्थिनीने 86.67% गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमातील तनिशा विनोद पालटकर या विद्यार्थीनीने 74.33% गुण प्राप्त केले आहे.

अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी , संस्थेचे सचिव तथा नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार अॅड. अभिजीत बंजारी, संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मिता वंजारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे व पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com