पाचव्या ऊर्जा ब्रेन अँरिथमेटिकच्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत विद्यार्थी चमकले, ऊर्जा ब्रेन अँरिथमेटिकचा उपक्रम

नागपूर :-विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती मिटवण्यासाठी उर्जा ब्रेन अरिथमेटीक या संस्थेच्या वतीने 5 व्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे आयोजन रायल माँ गंगा सेलिब्रेशन नागपूर येथे नुकत्याच झालेल्या 22 जानेवारी रोजी करण्यात आले असून संपूर्ण भारतातून या स्पर्धेत 1000 हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धेतील उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी 6 मिनिटांत 70 गणिते सोडवली. या स्पर्धेत 200 हून अधिक पुरस्कार, 700 पदके, रोख पारितोषिके आणि चॅम्पियन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ.मनोजकुमार गोखे (ग्रेड ए अकाऊंट ऑफिसर), अतिथी अध्यक्ष पुरस्कार प्राप्त मिस मैत्रेयी मोहन घनोटे यांनी आपल्या भाषणाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच बक्षीस वितरण कार्यक्रमा दरम्यान प्रमुख पाहुणे डॉ. उदय बोधनकर (बाल तज्ज्ञ), अतिथी डॉ. आशिष बडिये (एचओडी इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स) मोहन नाहतकर (एम.पी.एज्युकेशन सोसायटीचे सचिव) यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे श्रेय आयोजक हितेश आदमाने, रोशन काळे आणि इतरही शिक्षकांना दिले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com