संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील सिटी हॉस्पिटलच्या पार्किंग मधून उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या मुलाने ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती .यासंदर्भात फिर्यादी देवीदास खेरगडे वय 38 वर्षे रा प्रेमनगर निमखेडा ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली असता या दुचाकी चोरीचा पर्दाफाश करण्यात नवीन कामठी पोलिसांना नुकतेच यशप्राप्त झाले असून या कारवाहितुन तीन दुचाकी चोरट्याना अटक करीत त्यांच्याकडून चोरीस गेलेली चाळीस हजार रुपये किमतीची होंडा लिव्हो दुचाकी क्र एम एच 40 बी एम 8291 हस्तगत करण्यात आली.
अटक तीन आरोपी मध्ये राजू उर्फ मनोहर मेश्राम वय 40 वर्षे रा साकोली,अतुल बिसेन वय 23 वर्षे रा परसवाडा जिल्हा बालाघाट,विवेक उर्फ राजा कनोजे वय 20 वर्षे रा बालाघाट असे आहे.ही यशस्वी कारवाही पुलिस उपायुक्त श्रवण दत्त , सहायक पुलिस आयुक्त, वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रमोद पोरे यांचे मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे अनिल बाळराजे, राजेश पाल, नसीम अंसारी, भूपेंद्र सनोडिया, विकास उइके यांनी केली.