गोंदियात पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार..

अमरदीप बडगे, प्रतिनिधी

मुलीचे गर्भधारणा झाल्याचे कळताच अवैधरीत्या केला गर्भपात

पीडितेची मुलीवर उपचार सुरु

एक आरोपीस अटक

गोंदिया-भंडारा अत्याचाराची शाही वाळत नाही तोच गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत उघड किस आल्याने. जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीवर 26 वर्षाच्या तरूणाने भुलथापा देत सतत अत्याचार केल्याने तीअल्पवयीन मुलगी चार महिन्याची गर्भवती झाल्याचे समजताच नराधमाने मेडिकल स्टोअर्समधून अवैधरीत्या गर्भपाताच्या गोळ्या डाँक्टरच्या प्रीक्रीक्शन शिवाय खरेदी करून जबरदस्तीने त्या मुलीला खायला दिल्याने तिची प्रकृती आता गंभीर असून तिच्यावर गोंदियातील बाई गंगाबाई रूग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.

 

दरम्यान याप्रकरणी शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी बाई गंगाबाई रूग्णालयाला भेट देत पिडीतेची विचारपूस करीत शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com