संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 20 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या कामठी मौदा विधानसभा निवडणूक कार्यक्रमानुसार 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत नामांकन अर्ज दाखल करायचे आहे त्यानुसार नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या एक दिवसा आधी आज महाविकास आघाडी तर्फे कांग्रेसच्या वतीने सुरेश भोयर यांनी आज 28 ऑक्टोबर ला निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार गणेश जगदाडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.याप्रसंगी उमेदवारी अर्ज सादर करताना प्रामुख्याने माजी मंत्री सुनील केदार,खासदार श्यामकुमार बर्वे,जी प अध्यक्ष मुक्तता कोकुर्डे, माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत उपस्थित होते. तसेच आजपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या सात झाली असून त्यामध्ये कांग्रेस चे सुरेश भोयर,जय विदर्भ पार्टी चे प्रशांत नखाते,आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया चे विजय जगन डोंगरे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे अमोल वानखेडे,तसेच अपक्ष उमेदवारात राजू वैद्य,रघुनाश सहारे चा समावेश आहे. 25 ऑक्टोबर पर्यंत 66 व्यक्तींनी 114 अर्जांची उचल केली आहे.हे इथं विशेष!
आज महाविकास आघाडीचे कांग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश भोयर यांनी मोठ्या संख्येतील पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांच्या समवेत शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज सादर केले.ज्यामध्ये जी प उपसभापती कुंदा राऊत, जी प सदस्य नाना कंभाले,जी प सदस्य दिनेश ढोले,कामठी पंचायत समिती सभापती दिशा ताई चनकापुरे, कांग्रेस चे पदाधिकारी, प्रसन्ना तिडके, जयंतकुमार दळवी,पुरुषोत्तम शहाणे,हुकूमचंद आमधरे, कांग्रेस शहराध्यक्ष रमेश दुबे,लक्ष्मण संगेवार, माजी नगराध्यक्ष शकुर भाई नागांनी,माजी नगराध्यक्ष गुड्डू मानवटकर,माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान,माजी नगरसेवक नीरज लोणारे, माजी नगरसेविका ममता कांबळे,आशिष मेश्राम,राजेश कांबळे, प्रमोद खोब्रागडे आदी उपस्थित होते.