आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी रहिवासी व कामठीच्या सैन्य विभागातील एपीएस विभागात स्वयंपाकी म्हणून नोकरीवर असलेल्या विश्वजित धमगाये नामक 25 वर्षोय तरुणाने माध्यप्रदेश राज्यातील शिवणी येथील के.के.लॉज च्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 28 ऑक्टोबर 2022 ला सकाळी 10 वाजता उघडकीस आली असता मृतकाच्या घरमंडळी नातेवाईकांना एकच धक्का बसला होता यावेळी आत्महत्येचे कारण कळू शकले नव्हते मात्र ही आत्महत्या नसून घातपात झाला असल्याचा दावा घरमंडळी करीत असल्यांने पोलिसांनी तपासाला गती देत योग्यरीत्या तपास केला असता घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटनुसार सुसाईड नोट मध्ये लिखित माहितीनुसार आर्थिक व्यवहार व प्रॉपर्टीच्या कारणाहून प्रताडीत होऊन आत्महत्या करीत आहे व आरोपीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप नमूद होता.या आधारे पोलिसांनी सदर प्रकरणात मृतक विश्वजित धमगाये च्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपीवर भादवी कलम 306,34 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झालेल्या तीन आरोपी मध्ये राम शर्मा, संजय शर्मा व सुभोजित कडू तिन्ही राहणार कामठी असे आहेत हे तिन्ही आरोपी अजूनही अटकेबाहेर असून पुढील तपास सुरू आहे.

NewsToday24x7

Next Post

विभागीय लोकशाही दिन सोमवारी

Wed Jun 7 , 2023
नागपूर :- प्रत्येक‍ महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी होणारा लोकशाही दिन सोमवार 12 जून 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. विभागाशी संबंधित असलेल्या प्रलंबित तक्रारीचा निपटरा यासाठी उक्त अधिकारी यांनी विभागीय लोकशाही दिनास माहितीसह उपस्थित राहावे, असे उपायुक्त (गोसेखुर्द) घनश्याम भूगांवकर यांनी प्रसिद्धी प्रकाव्दारे कळविले आहे.

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com