अमरदिप बडगे, प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या ९८ शाळा मध्ये एकच शिक्षक! ;९८ शाळेत २० पेक्षा हि कमी विद्यार्थी
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील ९८ शाळे मध्ये २० पेक्षा कमी पट संख्या असुन त्यांना शिकविण्यासाठी एकच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने कमी पट संख्या शाळांची मान्यता रद्द होणार, कि काय अशा प्रश्न आता पालकांच्या समोर निर्माण झाले आहे. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना शिक्षन शिकविण्यासाठी एकच शिकांची नियुक्ती केल्याने त्यांच्या भविष्याशी कसा खेळ खेळाला जात आहे, हे गोंदिया जिल्ह्यात बघायला मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व संस्था कडून संचालित ९८ शाळा मध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. विशेष म्हणजे या ९८ शाळे मध्ये वर्ग एक तते वर्ग चार च्या विद्यार्थाना प्रवेश देण्यात आला आहे. आरटीई च्या अंतर्गत प्रत्येक दोन शिक्षकनाची नियुक्ती करणे आवश्यकत आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात आरटीई कायच्या अंतर्गत सरास उल्लघंन केल्याचे दिसत आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात या शाळे मध्ये एक हि विद्यार्थी शिल्लक राहणार नाही. असे संकेत दिसत आहे. त्या मुळे या शाळेच्या अस्तित्व धोख्यात आले आहे.