संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- हिवरा येथील शेता जवळील नहरावर लावलेली ३ एचपी चे मोटर पंप कुणीतरी अज्ञात इसमाने चोरी केल्याच्या शेतक-याच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसानी गुन्हा नोंद करून पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.
अरुण मानिक फुले वय ५० वर्ष राह. हिवरा ता मौदा जि. नागपुर हे शेती करित असुन शेतात धानाचे पिक असुन धाणाला पाणी देण्यासाठी विराट कंपनी ची ३ एच पी चे मोटार पंप २०२२ मध्ये लावले होते. हे नेहमी त्याच्या शेताजवळील नहरावर मोटारपंप लावुन शेतीला पाणी देत असत. (दि.६) ऑक्टोंबर २०२३ ला रात्री १० वाजता नहरावर लावलेली मोटार पंप शेतात पाणी सुरु करून नि़घुन गेले. दुस-या दिवशी (दि.७) ला सकाळी ७ वाजता शेतात गेले असता तेव्हा त्याना शेताजवळील नहरावर लावलेली जुनी वापरती विराट कंपनीची मोटार पंप ३ एचपी दिसले नाही. मोटार पंपच्या पॅनलचे ग्रीप काढले होते आणि केवल शेतात पडलेले दिसले, आजुबाजुला विचारपुस केली व शोध घेतला असता मोटारपंप मिळुन आले नाही. तेव्हा लक्षात आले की, कोणीतरी अज्ञात इसमाने (दि.६) ला रात्री १० वाजता ते (दि.७) ऑक्टोंबर चे सकाळी ७ वाजता दरम्यान शेता जवळ नहरावर लालेली विराट कंपनीची मोटार पंप ३ एच पी ची जुनी किंमत आठ हजार रुपयाची चोरून नेली. करिता कन्हान पोस्टे ला तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला चोरी चा गुन्हा नोंद करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शो़ध घेत आहे.