शेतीची अतिक्रमणे नियमानुकुलन करण्याची मागणी
नागपूर :- शिंदे -फडणवीस सरकार यांनी शासकीय समिती गठीत करावी याकरिता गडकरी यांना दिले निवेदन.
बिगर ७/१२ शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांनी पत्र परिषदेमध्ये सांगितले की गडकरी यांना निवेदन देऊन शेतीची अतिक्रमणे नियमानुकूलन करण्याकरिता शिंदे – फडणवीस सरकारला शासकीय समिती गठीत करण्याची मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या अध्यक्षखाली पत्रपरिषद मध्ये उपस्थित भदंत हर्षबोधी, भैय्यासाहेब खैरकर, भास्कर भोसले, कुरेसिंग पवार, विलास पवार , प्रवीण भोसले आणि भारती पवार यांची उपस्थिती होती.