बाईक चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक , २ बाईक जप्त

– दिनेश दमाहे,मुख्य संपादक

नागपूर –  शांती नगर कॉलोनी ,हनुमान मंदिर रोड जवळ राहणारा फिर्यादी नामे निलेश  शिवरतन  भवरीया, वय 35 वर्ष,  हे दि. 21/01/22 चे दुपारी 03ः00 वा. दरम्याण त्याचे वडील मेयो हॉस्पीटल वार्ड क्र.06 येथे आजारी असल्याने अँडमीट असुण त्याना जेवनाचा टिफीन देण्याकरिता वार्ड क्र. 06 समोर त्याचे वाहन हॅण्डल लॉक करून ठेवले त्यांनी त्यांचे वडीलांना टिफीन देवुन 03ः20 वा. परत गाडी ठेवलेल्या ठीकाणी आले असता त्यांना त्याची गाडी दिसुण आली नाही त्यांनी त्याचे वाहनाचा शोध आजुबाजुला घेतला असता मिळुण न आल्याने व त्यांना खात्री झाली कि अज्ञात चोराने गाडी चोरी केली आहे त्यांनी दिलेल्या फिर्याद वरून कलम 379 भादवि चा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गून्हयात आरोपी नामे मो सददाम मो अब्दूल्ला वय 28 वर्ष रा- प्लॉट नें 47 आर के ले आउट फहीज अंसारी यांचे राहते घरी किरायाने काच कंपनी आजरी माजरी पोस्टे यशोधरानगर नागपूर यांस अटक केले तो गाडी चोरी करून त्याची कटींग करून वस्तीत येणारे जाणारे कबाडीस मिळेल त्या किंमत मध्ये विक्रि केले व उर्वरीत मूददेमाल त्याचे राहते घरून जप्त केले आरोपी ने आपले राहते घरी चोरीस केलेले गाडी कटींग करून पूरावा नाहीसा केला असल्याने सदर गून्हयात कलम 201 भादवि प्रमाणे वाढ करण्यात आली सदर आरोपीस कसोशिने विचारपूस केले असता त्याने आपल्या कबूली बयानात सांगितले कि यापूर्वी मी दि 8/01/22 रोजी मोमीनपूरा मो अली सराय जवळ फिरत असता तेथून एक अॅक्टिवा गाडी क्र एम.एच.49.डब्लू.5483 ही चोरी केली व ती गाडी घेवून ताजबागला जात असता गाडीच पेट्रोल संपल्याने गाडी पोस्टे गणेशपेठ चे बाहेर सोडले होते असे त्याने त्याचे कबुली जवाबात सांगीतल्याने त्याबददल पोस्टे चे गून्हे अभिलेख तपासले असता सदर गाडीबाबत पो.स्टे. गणेशपेठ येथे कलम 379 भादवि प्रमाणे नोंद असल्याचे दिसले त्यावरून सदर गाडी हि पंचासमक्ष जप्त करुन आरोपी कडुन एकुण रु. 65180/- चा मूददेमाल जप्त करण्यात आला. सदर गून्हयाचा अधिक तपास सूरू आहे.
वरील कामगिरी नागपूर शहराचे  अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग)  नवीनचंद्र रेड्डी यांचे निर्देशान्वये  पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. 3  गजानन शिवलिंग राजमाने,  सहायक पोलीस आयुक्त(कोतवाली विभाग)  संजय सुर्वे यांचे पो.स्टे. तहसिल चे वरिष्ठ पो.नि. जयेश भांडारकर, दू.पो.नि. बबन येडगे, सपोनि संदिप बागुल, सहा.फौ.प्रमोद शनिवारे, सफौ संजय दुबे, ना.पो.शि.शंभुसिंग किरार, पो.कॉ.यशवंत डोंगरे, पो.कॉ. पंकज बागडे, पो.कॉ. पंकज निकम, नापोशि प्रशांत  चचाने, नापोशि  पुरूषोत्तम जगनाडे, पोशि  रंजीत बावणे यांनी केली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com