संस्थेतून समाजात लोकाभिमुख कार्य करणारे विद्यार्थी घडतील- कमकिशोर फुटाणे यांचा विश्वास..

स्थानिक स्वराज्य संस्थेचा वार्षिकोत्सव

नागपूर : आपल्या संस्थेतून दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्थेत दरवर्षी विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रूजू होतात. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर समाजामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून लोकभिमुख कार्य करणारे विद्यार्थी घडतील, असा विश्वास नागपूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे स्थानिक स्वराज्य दिनाचे आयोजन इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दैनिक तरूण भारताचे मुख्य संपादक गजानन निमदेव, विभागीय संचालक जयंत पाठक उपस्थित होते.पुढे बोलताना  कमलकिशोर फुटाणे म्हणाले, प्रशासनात काम करताना झोकून कार्य करणारे आणि लोकाभिमुख कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी असणे आवश्यक असते. स्थानिक स्वराज्य संस्थेतून काम करताना प्रशिक्षण आवश्यक असते. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी होते. त्यामुळे ते प्रभावीपणे काम करू शकतात. शासनाच्या अनेक योजना असतात, त्या जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचिविण्याचे काम प्रशासनाचे असते. यासाठी संस्थेतील विद्यार्थ्याना याचा फायदा प्रशासनात काम करताना निश्चितपणे येईल, असेही कमलकिशोर फुटाणे म्हणाले.

यावेळी विविध अभ्यासक्रमातून गुणवत्ता प्राप्त  विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छता निरिक्षक अभ्यासक्रमात प्रथम पारितोषिक मंजिरी राऊत हिला मिळाले. द्वितीय पारितोषिक मौसम बैरिशाल, मितेशा चावरे, हर्षना लाडे, शैलजा पवार यांना मिळाले. तिसरे पारितोषिक वैभवी भुजाडे हिला मिळाले. अग्निशमनकर्मी अभ्यासक्रमातून प्रथम आलेल्या योगेश नेमाडेला देखील पारितोषिक प्रदान करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात रूजू झालेल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये याशिका राऊत, संदीप चाटे, रोशन बैसकर, वैभव राऊत, काशिनाथ मुजमुले, दिनेश देवकाटे, महेश ठाकरे, बालाजी केंद्रे, अनिकेत मेरकेटे, कार्तिक शहाणे, हर्षल वैद्य यांचा समावेश आहे.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक विभागीय संचालक जयंत पाठक यांनी केले. भाग्यश्री वाडे यांनी संचालन व आभारप्रदर्शन केले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे 3 हजार 501 कोटी जिल्ह्यांना सुपूर्द

Sat Sep 10 , 2022
वाढीव मदतीबाबत निर्णयानंतर शासन निर्णय जारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदतीचा दिला होता शब्द मुंबई :- जून जुलै ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल सांगितले होते आणि त्याप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयही घेण्यात आला होता. राज्यातील ठिकठिकाणच्या पूरग्रस्तांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!