नाग नदीच्या पुरामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची उपमुख्यमंत्र्यांकडून पहाणी

– दहा हजार घरांचे नुकसान

– घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य भिजले

– नागरिकांना आवश्यक मदत

– घरातील चिखल काढण्यासाठी प्राधान्य

– संपूर्ण सफाईला सुरुवात

नागपूर :- नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे , घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात येईल, तसेच नुकसानी संदर्भात पंचनाम्याला दुपारी सुरुवात करून तात्काळ मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चार तासात जोरदार पावसामुळे अंबाझरी परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे अन्नधान्य सह इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली.डागा लेआउट , कार्पोरेशन कॉलनी,शंकर नगर सह इतर वस्त्यांना भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला.तसेच घरात चिखलामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली.

सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले असून या नुकसानी संदर्भात नागरिकांना संपूर्ण मदत करण्यात येईल ,अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. झालेल्या नुकसानी संदर्भात नागरिकांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या, जास्तीत जास्त मदत करण्याची ग्वाही यावेळी फडणवीस यांनी दिली.

नाग नदीला आलेल्या पुराची तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटनेची संपूर्ण माहिती यावेळी त्यांनी घेतली तासात 109 मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नदीचे पात्र कमी पडल्यामुळे इतर वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यापुढे अशी घटना घडणार नाही याची दखल घेण्यात आली असून पाण्याचा प्रवाह कुठेही थांबणार नाही, या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येईल. भविष्यात अशा घटना टाळण्यास येतील असेही नागरिकांना त्यांनी सांगितले.

पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे सर्वत्र चिखल साचला आहे. तसेच घरातील चिखल काढण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्वांना क्लोरीनच्या गोळ्या देण्यात येत आहेत.जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिलेत.

उपमुख्यमंत्र्यांनी सकाळी अंबाझरी तलाव, नाग नदी तसेच कार्पोरेशन कॉलनी डागा लेआउट शंकर नगर आधी सर्व भागांना भेट देऊन पाहणी केली यावेळी माजी महापौर संदीप जोशी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

350 नागरिकांना आपात्कालीन परिस्थितीतून सुखरुप बाहेर काढले

Sun Sep 24 , 2023
– मनपासह सर्व बचाव संस्थांचे बचाव आणि मदतकार्य निरंतर सुरू – मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वतः घटनास्थळांना भेटी देवून मदत कार्याचा आढावा घेतला. नागपूर :- शुक्रवारी (ता.२२) रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी जमा झाले तर काही ठिकाणी झाडे पडली. या सर्व ठिकाणी युद्धस्तरावर बचावकार्य करण्यात आले असून, मनपाच्या अग्निशमन व आणिबाणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com