नागपूर :- पो.स्टे. बेला फिर्यादी नामे यादव प्रभाकर रोगे, वय ३५ वर्ष, रा. आलागोंदी ता. बेला जि. नागपूर यांच्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन बेला येथे अप क्र. २८६/१९ कलम ३०७ भादंवि सहकलम ४/२५ आर्म अॅक्ट कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
दि. ३१/०८/२०१९ रोजी चे १२.०० वा. दरम्यानयातील आरोपी नामे-रमेश आंबादास बलकी वय ५० वर्षे रा. आलागोंदी ता. बेला जि. नागपुर ग्रामीण व फिर्यादी नामे-यादव प्रभाकर रोगे वय ३५ वर्षे रा आलागोंदी ता. वेला जि.नागपुर ग्रामीण व त्याचा भाउ जखमी नामे अंकुश प्रभाकर रोगे वय ३० वर्षे रा.आलागोंदी हे गावातील चौकात बसले असतांना आरोपी यांने जखमी यास पाहून म्हटले की तु परमात्मा एक सेवकाचा धर्म घेतला आहे असे म्हणून चिडवत होता त्यामुळे जखमी याने त्यास म्हटले की तु मला का चिडवतो असे म्हणुन त्या कारणावरून बिडून एका काडीने आरोपीने जखमीचे पाठीवर मारले जखमी त्याची काडी धरून फेकल्याने आरोपी हा चिडला व त्याने घरी जावून बकरा कापण्याचे सुरी सारखे हत्यार आणुन त्याने अचानक जखमीच्या पोटाच्या डाव्या भागावर मारून जिवाने मारण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणाचे तपाससपोनि सतीश मेश्रामयांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. न्यायालयात दाखल केले होते. सदर प्रकरणात मा. डीजे ११ एस. एस. नागुर मॅडमयांनी दिनांक २३/१०/२०२४ रोजी वरील नमुद आरोपीस कलम ३०७ भादवि मध्ये ०३ वर्षे सश्रम कारावास व ५,०००/रू दंड, दंड न भरल्यास ०३ महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी सायखेडकर यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणून पोहवा अजय सिंग पोस्टे बेला यांनी मदत केली आहे.