कामठीतील थकबाकीदाराविरुध्द कामठी नगर परिषदची वसुली मोहीम तेजीत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-दोन मोबाईल टॉवर केले सील 

कामठी :- कामठी नगर परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक भाग असून कामठी नगर परिषदला प्राप्त विविध कर वसुलीतीन कामठी नगर परिषदचा कारभार सुरू असून प्राप्त शासकीय निधीतून शहराच्या विकास करण्यात येतो तर स्थानिक मालमत्ता धारकाकडून मिळत असलेले’ कर ‘कामठी नगर परिषदच्या आर्थिक उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे.यासाठी नागरिकांनी कामठी नगर परिषद च्या विविध कराचा भरणा करून नागरिकांनी कामठी नगर परिषदला सहकार्य करावे असे नेहमी आवाहन करण्यात येते तरीसुद्धा बहुधा नागरिकांकडून कामठी नगर परिषद प्रशासनाला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने शहरातील विविध नागरिकावर कराची थकबाकी कायम आहे. या वर्षीचे आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असून नवीन आर्थिक वर्षे लागणार आहे तरीसुद्धा येथील स्थानिक मालमत्ताधारकावर एक कोटीच्या आत थकबाकी आहे.या कर वसुलीसाठी कामठी नगर परिषद प्रशासनाने कंबर कसली असून कामठी शहरातील मालमत्ता थकीत दाराविरुद्ध मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या नेतृत्वात 6 फेब्रुवारी पासून थकीत कर वसुलीला सुरुवात करण्यात आली असून दरम्यान काल सिंधी लाईन येथील चार दुकांनदारावर असलेल्या कराच्या थकबाकीच्या वसुलीसाठी गेले असता कराचा भरणा करण्यास प्रतिसाद न दिल्याने कर अधीक्षक व पथक यांनी या चार ही दुकानावर सीलबंद कारवाहिला सुरू करताच वेळीच 1 लक्ष 15 हजार 864 रुपयाचा भरणा केल्याने ही सीलबंद कारवाही टाळली. मात्र मोटर स्टँड चौक तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन जवळील लक्ष्मी टॉवर वरील एटीसी इन्फ्रास्ट्रक्चर चे मोबाईल टॉवर असे दोन मोबाईल टॉवर सीलबंद केले . एका थकीत दुकांनदारावर सीलबंद कारवाही करण्यात आली. इतर थकबाकीदारावर याप्रकारच्या सिलबंद कारवाहीचा बडगा न पडावा यासाठी थकीत मालमत्ता कराचा लवकरात लवकर भरणा करा असे आवाहन कामठी नगर परिषद चे कर अधीक्षक आबासाहेब मुढे यांनी केले आहे.

या मालमत्ता कर वसुली अभियानात थकीत मालमत्ता धारकावर केलेल्या सीलबंद कारवाहित मुख्यधिकारी संदीप बोरकर, कर अधीक्षक आबासाहेब मुढे, राहुल भोकारे,कर्मचारी प्रदीप भोकरे, विजय उर्फ गफ्फु मेथीयां, रुपेश जैस्वाल, मसूद अहमद, गौरव शर्मा, अक्षीश मलिक, गंगाधर मेहर, दीपक जैस्वाल आदी उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com