नागपूर :- फिर्यादी नामे हिमांशु कमलेश जैन वय २२ वर्ष रा. गौतम अपार्टमेंट, अशोक नगर, कांदीवली, मुंबई, ह.मु फ्लॅट नं. ५०४, लियात शिव ईलाईट टाउनशिप, न्यू खापरी, नागपूर हे त्यांचे टि.व्ही.एस अपाचे गाडी क. एम.एच २० एफ.ए २५८९ ने मित्रा सोबत पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीतुन नागपूर ते बुट्टीबोरी कडे जाणारे रोडवर, सिटी बस डेपो समोरील सर्विस रोडवरून जात असता बोलेरो कार क. एम.एच २७ डी.व्ही ८२९९ चा चालक नामे कुशल अजय बत्रा वय २० वर्ग रा. बापू कॉलोनी, दिप नगर, राजापेठ, अमरावती याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, हयगयीने व निष्काळजीपणे चालवुन, फिर्यादीचे वाहनाला बडक दिल्याने फिर्यादीचे डोक्याला, हाताला व छातीला मार लागुन गंभीर जखमी झाले, जखमीचा उपचार एम्स हॉस्पीटल येथे करण्यात आला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे बेलतरोडी येथे मपोउपनि स्नेहलता यांनी वाहन चालक आरोपीविरूध्द कलम २७९, ३३७, ४२७ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.