मोटरसायकल चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

कोंढाळी :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.स्टे. कोंढाळी हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलींग करीत असताना पोलीस स्टेशन कोंढाळी परिसरात गुप्त बातमीदार यांचे कडून खात्रीशीर बातमी मिळाली कि, नांदोरा फाट्याकडे १ पांढर्या रंगाची मोटार सायकल हिरो कंपनीची destiny १२५ एल एक्स ही गाडी संशयितरित्या फिरत आहे. या बातमी वरून नांदोरा शिवार येथे नाकाबंदी करून सदर हिरो कंपनीची destiny मोपेड मोटरसायकल क्र. MH-40/CN-4467 चालक मिळून आला. सदर चालकाला त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव मंगेश विष्णुजी धांडे, वय ४५ वर्ग, रा. कारंजा घाडगे जि. वर्धा असे सांगितले वरून मोटार सायकलचे कागदपत्राबाबत सविस्तर विचारपूस केली असता, दिनांक ०२/०९/२०२३ रोजी सायंकाळी मौजा चंदनपारडी फाट्याजवळ रोडवर एन. एच. ५३ रोड येथून सदर मोटारसायकल क्र. MH 40- CN 4467 ही मोटार सायकल चोरी केली असल्याचे सांगितले. या वरून पो.स्टे. कोंडाळी येथील गुन्हे अभिलेख तपासले असता पो स्टे कोंढाळी येथे अपराध क्र. ६८६/२०२३ कलम ३७९ भा.द.वि. चा गुन्हा नोंद असल्याने गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटार सायकल क्र. MH-40/CN-4467 किंमती २२,०००/-रू. ची जप्त करून गुन्हा उघडकीस आणला, आरोपी व मुरेमाल पुढील तपास प्रक्रियेकरिता पोलीस स्टेशन कोंढाळी यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई नागपुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से), अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, सहायक फौजदार चंद्रशेखर घडेकर, पोलीस हवालदार प्रमोद तभाने, रणजित जाधव यांनी पार पाडली.

NewsToday24x7

Next Post

जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

Sat Jan 20 , 2024
– पोलीस स्टेशन मौदा नागपुर ग्रामीणची कारवाई मौदा :- पोस्टे मौदा येथील पोलीस पथक पोलीस ठाणे परिसरात पेट्रोलींग करीत असताना आवंडी (भोवरी) शिवार परिसर येथे मुखवीरद्वारे खात्रीशीर माहिती मिळाली की, टाटा ट्रक क्र. एम. एच. ४०/वाय.-०९५१ मध्ये प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देत चारा पाण्याची सोय न करता भंडारा येथून नागपूरकडे जनावरे नेत आहे. अशा विश्वसनिय खबरेवरून मौदा पोलीस स्टाफ यांनी आवंडी भोवरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com