गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- फिर्यादी संगीता प्रविण इंगळे ४२ वर्ष रा. योगी अरविंद नगर, यशोधरानगर नागपूर व आरोपी संजय भिमराव तंत्रपाळे वय ३८ वर्ष रा. यशोधरा बौद्ध विहाराजवळ नागपूर हे दोघेही बहिन भाऊ असून फिर्यादी व फिर्यादीचा पती असे फिर्यादीची आईला भेटण्यासाठी आईचे घरी गेले असता भेट घेवुन परत येत असतांना आरोपीचा सात वर्षीय मुलगा यांनी फिर्यादीचे पतीला मला गाड़ी शिकवून दयाल का ” असे म्हटले असता. फिर्यादीचे पतीने मुलास “तू अगोदर मोठा हो मोठा झाल्यावर तूला गड़ी शिकवतो” असे म्हटले असता आरोपीने रागाचे भरात फिर्यादीचे पतीला शिवीगाळी करू लागला फिर्यादीने आरोपीस शिवीगाळ का करतो असे म्हटले असता आरोपाने फिर्यादीचे पती सोबत भांडण सुरू केले फिर्यादी ही भांडण सोडविण्यास गेली असता आरोपीने घरातून लोखंडी रॉड आणून फिर्यादीचे हातावर व डोक्याला टक्कर मारून गंभीर केले, जखमीचा उपचार मेयो हॉस्पीटल येथे सुरू आहे.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे सपोनि कन्नाके यांनी आरोपीविरुद्ध कलम ३२६ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

न्यायालयातुन आरोपीला शिक्षा

Sat Oct 7 , 2023
नागपूर :- दिनांक ०६.१०.२००३ रोजी मा. जिल्हा न्यायाधीश १३ वे आर. एस भोसले (पाटील) यांनी त्यांचे कोर्टाचे केस क. एम. पी. आय. डी ०१/२०१५ मधील पो. ठाणे अंबाझरी येथील अप क. ३९५/२०१४ कलम ४२०, ४०६, ४०९, ३४९ भादवि सहकलम ३ एम.पी.आय.डी अॅक्ट या गुन्हयातील आरोपी अमोल जगनाथ ढाके वय ४० वर्षे, रा. भरत नगर, पुरानीक ले-आउट, अमराती रोड, नागपूर यांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com