नागपूर लोकसभेचे ओबीसी उमेदवार निवडून येणार – भानुदास माळी

नागपूर :- नागपूर लोकसभा क्षेत्र इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार विकास ठाकरे यांचे प्रचारार्थ काँग्रेस कमिटी नागपुर शहर जिल्हा ओबीसी विभागातर्फे कार्यकर्ता मेळावा गुरुवारी सकाळी 11 एप्रिल रोजी देवडिया काँग्रेस भवन चिटणीस पार्क स्टेडियम जवळ महाल नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाला भानुदास माळी प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभाग विकास ठाकरे आमदार संगीता तलमले, ओबीसी काँग्रेस नेत्या, अजय हटेवार राष्ट्रीय समन्वयक, प्रकाश जानकर प्रदेश कोअर कमिटी सदस्य तथा प्रभारी नागपूर शहर जिल्हा गोविंद भेंडारकर विदर्भ विभागीय अध्यक्ष जेसाभाई मोटवानी प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार कुंभार, विजय राऊत संजय भिलकर, चंद्रकांत हिंगे, विजया धोटे, प्रमिला हरडे प्रदेश पदाधिकारी शहर अध्यक्ष राजेश कुंभलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी कार्यकर्ता मेळावा संपन्न पार पडला.

मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना भानुदास माळीनी नागपूर लोकसभेकरीता यावेळी विकास ठाकरेंच्या रूपात ओबिसी उमेदवार काँग्रेस पक्षाने दिला आहे. नागपूर शहरात ६२ टकके ओबिसी मतदार असून खंबीरपणे ठाकरे यांच्या पाठीशी राहिल्यास यावेळी नागपूरकरांना ओबीसी खासदार मिळेल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच सत्ताधारी भाजपचा समाचार घेतला. संचालन मोरेश्वर भादे यांनी केले तर कार्यक्रमाला भूषण तल्हार, प्रशांत पवार, आशिष काळे, माधवराव गावंडे, प्रकाश लायसे, मॉन्टी मुटकुरे, रंजना कडु, स्नेहल दहिकर, कुंदा हरडे, संजय कडुसह सर्व शहर पदाधिकारी व ओबीसी कार्यक्रत्यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

Fri Apr 12 , 2024
मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात गृह तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बृहन्मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, मंत्रालय सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त प्रशांत परदेशी, कर्मचारी संघटनेचे भारत वानखेडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Follow us on […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com