संत शिरोमणी संत श्री नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- हरी हराचा वाद मिटविणारे संत नरहरी वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी, हरी हराचा वाद मिटविण्यासाठी आयुष्यभर झटणारे आणि शिव उपासक म्हणून जीवन विठ्ठलमय करणारे सुवर्णकार(सोनार)समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संत नरहरी महाराज (सोनार) यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कामठी,येरखेडा ,रणाळा येथील सुवर्णकार समाजातर्फे संत नरहरी महाराज पुण्यतिथी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली.या मिरवणुकीत ठीकठिकाणी संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले.

ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आले होते ज्यामध्ये मोठ्या संख्येतील सुवर्णकार समाजबांधवाने सहभाग नोंदविला होता.

या मिरवणुकीत माजी नगरसेवक कपिल गायधने, सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष उमेश मस्के, माजी अध्यक्ष दिलीप गुरव,प्रमोद पेठे,अरविंद ढोमणे,संजय करंडे,प्रफुल गुरव,दिनेश गुरव,मिलन ढोमणे,दिलीप डोंमडे आदी सहभागी होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हेमा संतोष आठवले यांचे दु:खद निधन

Tue Feb 27 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  मुंबई :- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले याचे चुलत बंधु संतोष यांच्या पत्नी हेमा संतोष आठवले यांचे वयाच्या 40व्या वर्षी मुलुंड येथे हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हेमा संतोष आठवले यांच्या दु:ख निधनाने आठवले परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलुंड मध्ये रिपब्लिकन चळवळीत तिव्र दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. हेमा आठवले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com