जुन्या भांडणाच्या वादावरून आरोपींनी महिलेचा केला विनयभंग..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत धरम नगर येथे शुभम सलामे व इतर साथीदारांनी जुन्या झगडा भांड णाच्या वादावरून चाकु, तलवार घेऊन महिलेच्या पती ला शिवीगाळ करित महिलेला ओढुन विनयभंग केल्या ने कन्हान पोलीसांनी महिलेच्या तक्रारी वरून पोस्टे ला सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार रविवार (दि.१६) ऑक्टोंबर ला रात्री १०.३० वाजता महिला तिचे पती विशाल चिंचोळकर व मुल जेवण करून घरीच हजर असतांना १) शुभम सलामे, २) तेनाली, ३) सन्नी गजभिये, ४) प्रशांत सार्वे, ५) रोहीत यादव, ६) साहील मधुमटके सर्व राह. कन्हान व इतर साथीदार हे अचानक अंगणा तुन महिलेच्या घराचे दारावर आले. तेव्हा शुभम सलामे, प्रशांत सार्वे यांच्या हातात तलवार असुन तेनाली याच्या हातात चाकु होता, त्यांनी जुन्या भांडणा चे कारणावरून महिलेच्या पतीला शिवीगाळ करू ला गल्याने महिला दरवाजा बंद करण्यास गेली असता शुभम सलामे याने महिलेच्या हात पकडुन स्वताकडे ओढुन महिलेचा विनयभंग केला. महिला व तिचे पती विशाल यांनी आपला जिव वाचवण्यासाठी दार बंद केले. तर त्यांनी दारावर तलवार मारून जोर जोरात ओरडुन शिवीगाळ करून ” तु निकल बाहर तेरा मर्डर करना है ” अशी धमकी देवुन ते हातात तलवारी लहरू न निघुन गेले. कन्हान पोलीसांनी फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरून पोस्टे कन्हान ला सहा आरोपी विरुद्ध अप क्र.६०६/२२ कलम ३५४ (ब), १४१,१४३,१४७, १४८, १४९, ५०६, ५०४, भादंवि, सहकलम ४/२५ आर्म अँक्ट , १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्ष क विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम हे करीत आरोपीचा शोध घेत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com