महारोजगार मेळाव्यात कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांचे दालन

– आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे आयोजन

नागपूर :- महाराष्ट्र शासनातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रोजगार व रोजगाराच्या संधी यावर भर देण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे नमो महारोजगार मेळाव्यात विविध कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांचे दालन विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उघडण्यात आले.

मेळाव्यामध्ये आलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी विद्यापीठात चालनाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती जाणून घेतली. कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध रोजगाराच्या संधीची माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याची माहितीसुद्धा देण्यात आली. या दालनाद्वारे विद्यापीठ स्तरावर सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी कौशल्यधिष्ठित उपक्रमाचे महत्व विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. आंतरविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, विद्यापीठाचे प्रशिक्षण व रोज़गार अधिकारी डॉ. भूषण महाजन यांनी उपक्रमाबाबत सदिच्छा व्यक्त केल्या. विभागाचे संचालक डॉ. निशिकांत राऊत यांनी सविस्तर माहिती दिली. विभागाचे सहा. संचालक डॉ. समित माहोरे, विभागातील प्रकल्प अधिकारी डॉ. अमित झपाटे आणि निलेश उईके व प्रितेश शिरसुदे यांनी आयोजनात महत्वाची भूमिका बजावली. याप्रसंगी विविध अभ्यासक्रमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये राष्ट्रीय अग्निसुरक्षा अभियांत्रिकी संस्था (NAFS) चे संजय बावणे, मंगेश निनावे, श्री साई समर्थ शैक्षणिक व मेडिकल सोसायटी संस्थेचे तेजस जोशी, वेदिक(VEDIC)(VDIH) चे माधवी मॅडम, नेक्सस इन्फोसेक चे सय्यद मुमताज हे उपस्थित होते. पुढील उपक्रमासाठी कुलगुरु महोदयांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करणारे ‘मिशन ई सुरक्षा’

Mon Dec 11 , 2023
– राज्य महिला आयोग आणि मेटा यांचा संयुक्त उपक्रम नागपूर :- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यभरातील विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करण्यासाठी ‘मिशन ई सुरक्षा’ उपक्रम हाती घेतला असून नागपुरातील वनामती सभागृहात गुरुवार (दि 14) रोजी दुपारी 2 वाजता होणाऱ्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com