प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र व एमएफआरएस चे कन्हान येथे उद्धघाटन

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रा चे उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमांर्तगत कोरोमंडल इंटर नॅशनल लि. कंपनी व्दारे सौरभ कृषी केंद्र कन्हान येथे कृषी सल्ला व मार्गदर्शन केंद्र स्थापन करून उद्धाटन करण्यात आले.
प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात उद्घाटना अंत र्गत कोरोमंडल इंटरनॅशनल लि कंपनी या संस्थे व्दारे नागपुर जिल्हयात कृषी सल्ला व मार्गदर्शन केंद्र सौरभ कृषी केंद्र कन्हान येथे स्थापन करून सोमवार (दि. १७) ऑक्टोंबर २०२२ ला जिल्हा कृषी विकास अधिकारी  जयंत कौउटकर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन तसेच न्यूट्रीक्लिनिकचे उद्घाटन ही करण्यात आले. या प्रसंगी पारशिवनी तालुका कृषी अधिकारी मा देशमुख साहेब, कामठी तालुका कृषी अधिकारी पंकज लोखंडे , मौदा चे रोशन गुलाले , सौरभ कृषी केंद्राचे संचालक दिपक गडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते . यावेळी कंपनी सिनिअर झोनल मॅनेजर बी.बी पांडा यांनी पीएमकेएसकेचा उद्देश स्पष्ट केला. कोरोमंडल कंपनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या हितासाठी नवा दुष्टिकोन आणि उच्च गुणवत्ता, संशोधन आणि विकास उपक्रम आणि चांगल्या उपायांसाठी, नवीन उत्पादनांवर लक्ष केंद्रित करतात. कृषी शास्त्रज्ञ माणि क आणि न्युट्रीक्लिनिक प्रभारी किरण यांनी आमची माती परीक्षण आणि सानुकूलित शेतकरी प्रिस्क्रिप्श न्स बद्दल स्पष्टीकरण करित मार्गदर्शन केले. सर्व कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सुचनांचे वेळेवेळी पालन करण्याची विनंती केली. क्षेत्र व्यवस्थापक विजय सोनटक्के यांनी सर्व शेतकरी बंधु व सर्व व्यावसायिक यांचे आभार व्यकत केले. कार्यक्रमास नागपुरचे सर्व संभाव्य डीलर्स व किरकोळ विक्रेते आणि कोरोमंडल कंपनीचे एमओएस, एमडीटीएस, डब्लुएचओ, फिल्ड कंट्रोलर तसेच परिसरातील ७० प्रगतीशिल शेतकरी उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com