राज्यस्तरीय युवा महोत्सव ऑनलाईन संपन्न

 नागपूर,दि. 07 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचे द्वारा विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड, मानकापूर येथे ऑनलाईन आभासी पद्धतीने राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी कलाकार व स्पर्धकांना शुभ संदेश देऊन केला.

            याप्रसंगी राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी सिद्धार्थ रॉय, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी श्री.विर, क्रीडा व युवक सेवाचे उपसंचालक शेखर पाटील व जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड उपस्थित होते.

            राज्यस्तरीय महोत्सवामध्ये लोकनृत्य प्रकारात अमरावती, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर या विभागातील 6 संघानी तसेच लोकगीत या कला प्रकारामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, लातुर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या विभागातील 8 संघांनी ऑनलाईन सहभाग घेतला.

            लोकनृत्य प्रकारात मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालय, नागपूर यांना प्रथम तर सि.के. ठाकुर कॉलेज, न्यु पनवेल, मुंबई – द्वितीय आणि झेनिथ इंडीया फाऊंडेशन, अमरावतीला तृतीय तसेच लोकगीत  प्रकारात प्रथम – सह्यांद्री शिक्षण सेवा मंडळ, रायगड, मुंबई, द्वितीय –  श्री. घोडगेरीसिद्ध ओविकार मंडळ, तळंदगे, जि. कोल्हापूर आणि तृतीय –  एस.व्ही.के.टी. आर्ट, सायन्स व कॉमर्स कॉलेज, देवळाली कॅम्प, नाशिक यांना मिळाला.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर पाटील तर आभार प्रदर्शन अविनाश पुंड यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीमती माया दुबळे यांनी केले.

News Today 24x7

Next Post

 अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात पहिला एफआयआर दाखल

Fri Jan 7 , 2022
नागपूर, ता. ७ :  नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात होणाऱ्या अवैध वृक्षतोडी विरोधात कठोर पाउल उचलले जात आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी (ता. ७) प्रतापनगर पोलीस स्टेशन येथे अवैधरित्या वृक्ष तोड करणाऱ्यांविरोधात उद्यान विभागातर्फे पहिला एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (ता.४) महापौर दयाशंकर तिवारी यांनी अवैध वृक्ष तोडण्याविरोधात पोलिसात तक्रार करण्याचे प्रशासनाला सक्त निर्देश दिले होते. त्यानुसार संबंधित कारवाई करण्यात आली आहे.           नवनिर्माण सोसायटी […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com