तांड्यांना गावठाण व ग्रामपंचायत घोषित करण्याची कार्यवाही गतीने करा – पालकमंत्री संजय राठोड

– पालकमंत्र्यांकडून तांडा समृध्दी योजनेचा आढावा

– तांड्यांसाठी १५३ कामे व १५ कोटी रुपये मंजूर

यवतमाळ :- बंजारा समाजाचे वास्तव्य असलेल्या तांड्यांच्या विकासासाठी शासनाने संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृध्दी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत बंजारा, लमाण तांडा घोषित करणे, गावठाण व तांड्यांना महसूली गाव, ग्रामपंचायत घोषित करण्याची कारवाई गतीने करावी. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावे, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.

महसूल भवन येथे त्यांनी संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृध्दी योजनेचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक ऊईके, राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, आ.राजू तोडसाम, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर, अशासकीय सदस्य छाया राठोड, गोवर्धन राठोड, पंजाबराव पवार आदी उपस्थित होते.

तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत व सामुहिक विकासाच्या सुविधा निर्माण करून विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने ही महत्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. गावठाण, महसूली दर्जा व ग्रामपंचायत नसलेल्या तांड्यांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावे. एकही तांडा सुटणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. जिल्ह्यातील तांड्यांच्या विकासासाठी तीन वर्षाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार यावर्षी विविध विकासकामांसाठी मंजुर निधी खर्च करतांना प्राधान्याची कामे आधी घेण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

तांड्यांना ग्रामपंचायतींचा दर्जा देण्यासाठी शासनाने लोकसंख्येची अट एक हजार वरून 700 इतकी केली आहे. तसेच तांड्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन गावातील अंतराची अट शिथील करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. योजनेंतर्गत जिल्ह्यात तांड्यात करावयाची १५३ विविध विकास कामे मंजूर झाली असून यासाठी १५ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्याचा प्रयत्न - पालकमंत्री संजय राठोड

Sat Feb 1 , 2025
– दारव्हा तालुका कला, क्रीडा, कबबुलबूल महोत्सवाचे उद्घाटन यवतमाळ :- जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्यासाठी माझी सातत्याची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच माँडेल शाळेसारखा उपक्रम आपण राबवतो आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. दारव्हा तालुकास्तरीय कला, क्रीडा, कबबुलबूल महोत्सवाचे आयोजन तालुक्यातील रामगाव (रामे) येथे करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी माजी जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!